scorecardresearch

‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ

ही ट्रॉफी पाहून सर्वजणच थक्क होताना पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ
'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूकचा व्हिडीओ समोर

यंदा ‘बिग बॉस’चे चौथे पर्वाचा रंजक प्रवास आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. ‘बिग बॉस’चे चौथे पर्व सुरु झाल्यापासून ते सातत्याने चर्चेत आहे. हे पर्व सुरु झाल्यामुळे त्यातील ट्वीस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि खेळ यावरुन यंदा ‘बिग बॉस’चे पर्व चांगलेच गाजले. ‘ऑल इज वेल’ या थीमवर आधारित असणाऱ्या ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळ्याला आता फक्त ३ दिवस शिल्लक आहेत. त्यातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर आला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबरला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला. त्यानंतर आता ‘बिग बॉस’च्या घरात मीड विक एव्हिकेशन पार पडले. यात अभिनेता आरोह वेलणकरला घराबाहेर जावे लागले. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टॉप ५ स्पर्धक समोर, ‘या’ सदस्याने घेतली एक्झिट

त्यातच आता ‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत बिग बॉसच्या घरातील सदस्य एका ठिकाणी बिग बॉसचा आदेश ऐकताना दिसत आहे. यावेळी ‘बिग बॉस’ त्यांना तुम्हाला भेटायला आली आहे ती, तुम्हीही तिला भेटायला उत्सुक आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर सर्व सदस्य हे एकमेकांकडे पाहताना दिसतात. यानंतर बिग बॉसने यंदाच्या बिग बॉसची ट्रॉफीची झलक दाखवली आहे. ही ट्रॉफी पाहून सर्वजणच थक्क होताना पाहायला मिळत आहे.

इतकंच नव्हे तर ‘कलर्स मराठी’ने या ट्रॉफीचा एक खास व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओ बिग बॉसच्या ट्रॉफीचा खास लूक पाहायला मिळत आहे. यावर बिग बॉसचा लोगोही पाहायला मिळत आहे. त्याखाली बिग बॉस आणि विजेता असेही लिहिण्यात आले आहे. या दोन्हीही व्हिडीओंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा : Video: किरण माने राखी सावंतच्या प्रेमात? लाल रंगाच्या नेलपेंटने प्लेटवर लिहिलं RK अन्…

दरम्यान बिग बॉसच्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत. यात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने, राखी सावंत या सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयाराही सुरु आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या