Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सातव्या आठवड्यात मोठा गोंधळ झाला. ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीदरम्यान वाद झाला. दोघींमध्ये झटापट झाली आणि आर्याने निक्कीच्या कानशिलात (Arya Slapped Nikki) लगावली. या घटनेनंतर मराठी कलाकार विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक राहिलेला अभिनेता अभिजीत केळकरने (Abhijeet Kelkar on Nikki Aarya Fight) निक्की व आर्या यांच्यातील या भांडणासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. हा खेळ संयम आणि मानसिक संतुलनाचा आहे, असं अभिजीतने म्हटलं आहे. “…आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं पण…हा खेळ संयमाचाही आहे, मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार…पण माफी माग. तू जेन्यून आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील”, अशी पोस्ट अभिजीतने केली आहे.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
Bigg Boss Marathi 5
Video: “तुम्ही जे केलं ते १०० टक्के…”, निक्कीला मारल्याप्रकरणी रितेश देशमुखने आर्याला विचारला जाब; म्हणाला, “निर्णय…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki marathi actress reaction
“जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “मनाने खंबीर…”
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?

“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

Abhijeet kelkar post about arya jadhav nikki
अभिजीत केळकरची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

घरात नेमकं काय घडलं?

कॅप्टन्सी कार्यात निक्की आणि आर्यामध्ये वॉशरुम एरियामध्ये मोठी झटापट झाली. आर्याने, निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल म्हणून बाथरुमचा दरवाजा लावून घेतला होता. निक्कीच्या सांगण्याप्रमाणे अरबाजने दरवाजा जोरात ढकलला आणि निक्कीने वॉशरुममध्ये प्रवेश घेतला. मागोमाग जान्हवी सुद्धा हिऱ्याचं रक्षण करण्यासाठी आत आली. याचदरम्यान आर्या- निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन वाद झाले आणि भडकलेल्या आर्याने निक्कीला कानाखाली वाजवली. यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन “बिग बॉस… हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाही” असं जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत होती.

“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…

यानंतर नेमकं काय घडलं याबाबत आर्याने स्वत:ची बाजू मांडत घरात स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, “दरवाजा उघडल्यावर निक्की आत आली. तिला मी बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिचा हात माझ्या डोळ्याखाली लागला आणि या झटापटीत मी तिला मारलं.”

आर्याने निक्कीला मारली कानाखाली; ‘बिग बॉस’कडून मोठी शिक्षा! आता जेलमध्ये टाकलं, अंतिम निर्णय कोण घेणार?

दरम्यान, आर्या आणि निक्कीतील झटापट आणि आर्याने निक्कीला थेट कानशिलात मारणं यावर सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. काही लोक आर्याचं समर्थन करत आहेत, तर काहींच्या मते आर्याने मारायला नको होतं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकलं आहे. आर्याला शिक्षा होणार, पण ती शिक्षा नेमकी काय असेल याचा निर्णय आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घेणार आहे.