Bigg Boss Marathi 5 चे पर्व सतत विविध कारणांमुळे चर्चेत असलेले पाहायला मिळते. बिग बॉसने स्पर्धकांना दिलेल्या टास्कमुळे, सदस्यांमध्ये झालेल्या वादामुळे, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने घेतलेल्या शाळेमुळे; तर कधी घरातील सदस्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे बिग बॉसचे पाचवे पर्व चर्चेत असलेले दिसते. आता समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अंकिता आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये सुरू असलेला संवाद चर्चेत आल्याचे दिसत आहे.

काय म्हणाला सूरज?

टीआरपी मराठीने इन्स्टाग्रामच्या पेजवर बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि सूरज चव्हाण एकमेकांशी बोलत आहेत. अंकिता सूरजला म्हणते, “मला सांगू नका की माझं काय करायचं ते, असं कसं बोलला? असं बोलणं चांगलं आहे का?” त्यावर सूरज म्हणतो, “तसं नाही, मी माझं सांगितलं.” अंकिता म्हणते, “काय सांगितलं? असं नाही बोलायचं”; तिच्या या बोलण्यावर सूरजने म्हटले, “आता ते बोलले मध्येच म्हणून मी बोललो, नाहीतर मी कधीच असं बोलत नाही.” अंकिता म्हणते, “त्यांनी तुला चांगल्यासाठीच सांगितलं ना, आपण काहीतरी कामाचं करतोय.” सूरज म्हणतो, “कामाचं आहे मला माहितेय, पण डीपीदादा मध्येच बोलले म्हणून बोललो; नाहीतर मला गरज नाही मध्ये मध्ये करायची.” अंकिता म्हणते, “पण नीट सांगायचं.”

इन्स्टाग्राम

आता अंकिता आणि सूरजमध्ये होत असलेल्या या संवादाची चर्चा होताना दिसत आहे. याबरोबरच घरात होणाऱ्या टास्कचीदेखील चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या आठवड्यात घरात जंगलराज असणार असल्याचे बिग बॉसने सांगितले होते. एका टास्कमध्ये स्पर्धकांना प्राण्यांना शोधून आणायचे होते, यावेळी अनेक गमतीजमती घडल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये स्पर्धकांना जादुई हिरा मिळवण्याचा टास्क दिला होता, त्यावेळी निक्की आणि आर्यामध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली होती, त्यामुळे तिला घराबाहेर जाण्याची शिक्षा दिली होती. याबरोबरच वैभव चव्हाण हा नॉमिनेशनमध्ये होता, त्याला कमी मतं मिळाल्यामुळे त्यालादेखील घराबाहेर पडावे लागले. आता या आठवड्यात घरात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.