Bigg Boss Marathi 5व्या पर्वात अनेक स्पर्धकांची सतत चर्चा होताना दिसते. बिग बॉसने दिलेले टास्क, स्पर्धकांमधील भांडणे, या स्पर्धकांच्या खेळावर बाहेरच्या जगात केली गेलेली वक्तव्ये यांमुळे हे कलाकार कायम चर्चांचा भाग बनतात. आता नायरा अहुजाने अरबाजच्या खेळावर आणि त्याची गर्लफ्रेंड असलेल्या लीझाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
स्प्लिट्सव्हिला १५ या शोमध्ये नायरा अहुजा व अरबाज पटेल हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यामध्ये ते दोघे एकमेकांचे पार्टनर होते. आता नायराने नुकतीच ‘टेली मसाला’ला मुलाखत दिली.
काय म्हणाली नायरा?
अरबाजची गर्लफ्रेंड लीझाविषयी बोलताना नायरा म्हणाली, “अरबाज आणि ती दोघेही खूप नाटक करतात. लीझा कोणाला तरी चॅटमध्ये म्हणते की, तो शो तो स्क्रिप्टेड आहे; लव्ह अँगल तर करावाच लागतो. दुसऱ्या कोणाला तरी ती सांगते की, मला खूप दु:ख होत आहे. त्याने त्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. कधी कोणाला सांगते लग्न झाले आहे, कधी नाही म्हणते. ‘स्प्लिट्सव्हिला’च्या वेळी अरबाजचे लग्न झाल्याच्या अफवा पसरवल्या आणि आता त्यांच्या पीआर कंपनीने नवीन स्ट्रॅटेजी आखली आणि माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवला की, लीझा गरोदर आहे. लग्न आणि मुलं यावर यांची प्रसिद्धी होण्यासाठी हा पूर्ण गेम प्लॅन बनवला गेला आहे. जेव्हा अरबाज घराबाहेर येईल तेव्हा तो आणि लीझा एकत्र येतील. मी आणि निक्की तांबोळीच सगळ्यांनाच मूर्ख दिसणार. सुरुवातीला मला लीझाविषयी सहानुभूती वाटत होती; मात्र आता मला वाटत आहे की, हा त्यांचा गेम प्लॅन आहे.”
‘स्प्लिट्सव्हिला’च्या शोमध्ये अरबाज आणि नायरा हे एकमेकांचे पार्टनर होते. या शोमधून बाहेर आल्यानंतर नायराने अनेक मुलाखतींमध्ये लीझा आणि अरबाजच्या नात्याबाबत वक्तव्य केले होते. आता नायरा बिग बॉस मराठीच्या घरात येत अरबाज पटेलची पोलखोल करणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा: Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात पहिल्याच आठवड्यात दोन घरांत दोन टीम तयार झाल्या होत्या. ए टीममध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव व अरबाज पटेल हे होते. अरबाज आणि निक्कीमध्ये चांगली मैत्री पाहायला मिळत आहे. त्यावरून अनेक चर्चादेखील होताना दिसतात. आता येणाऱ्या काळात त्यांचा खेळ कसा पुढे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.