Bigg Boss Marathi 5 चे पर्व सध्या विविध कारणांमुळे गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातील एक म्हणजे निक्की आणि अरबाज पटेलविषयी मोठी चर्चा होताना दिसत आहे. आता एका शोमध्ये अरबाज पटेलची पार्टनर असलेल्या नायरा अहुजाने त्याच्याविषयी केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.
स्प्लिट्सव्हिला १५ या शोमध्ये नायरा अहुजा आणि अरबाज पटेल हे सहभागी झाले होते. यामध्ये ते दोघे एकमेकांचे पार्टनर होते. नायराने नुकतीच ‘टेली मसाला’ला मुलाखत दिली.
काय म्हणाली नायरा?
मुलाखतीदरम्यान तिला विचारले की, तुला जर बिग बॉस मराठीची ऑफर आली आणि तुला वाइल्ड कार्ड म्हणून बोलावले तर तू काय करशील? यावर उत्तर देताना ती म्हणाली, “हे अपेक्षित आहे. कारण बिग बॉस मराठीमध्ये जे काही चालले आहे ते पाहिल्यानंतर अनेक जण मला कमेंट करून सांगत आहेत की, या शोमध्ये जा आणि निक्कीला वाचव. लोकांना वाटतंय की मी शोमध्ये जावं. ते वाट बघत आहेत मी बिग बॉस मराठीच्या घरात जाऊन अरबाज पटेलचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा. याआधीही मी सांगितले आहे की, अरबाज पटेलने काय केले आहे. पण, अनेक लोक स्प्लिट्सव्हिला बघत नाहीत; त्यामुळे लोकांना माहीत नाही, जे अरबाज आज निक्कीबरोबर करत आहे ते एका शोमध्ये माझ्याबरोबर त्याने केलेले आहे.”
“जनता तर मी बिग बॉस मराठीच्या घरात जावे यासाठी वाट बघत आहे. आता सगळे देवाच्या हातात आहे. असे झालेच तर ज्या दिवशी मी बिग बॉसच्या घरात जाईन त्या दिवशी धमाका होईल, हे मला माहितीय.”
पुढे बोलताना ती म्हणाली, “माहीत नाही, त्याच्याकडे कोणती हुशारी आहे. एक गर्लफ्रेंड आहे, आणखी दोन मुलींना त्याने तसेच काहीसे सांगितले आहे. अरबाजच्या डोक्यात हेच असते, ज्या मुलीवर नजर पडेल ती त्याची आहे. मला वाटते की हे सगळे नाटक आहे, तो अभिनय करत आहे. त्याची पीआर कंपनी की आणखी कोण त्याला हे शिकवतं माहीत नाही.”
“अरबाजचा स्वत:चा असा काही गेम नाही. लव्ह अँगलच त्याचा गेम आहे. बिग बॉसच्या घरात जर निक्कीला बाजूला केलं तर त्याचा स्वत:चा गेमच नाही. बाहेरपण त्याला जी प्रसिद्धी मिळत आहे ती लीझामुळे मिळत आहे. प्रत्येक शोमध्ये जाऊन एका मुलीला धरून तिच्याभोवती स्वत:ची गोष्ट तयार करायची.
हेही वाचा: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
बिग बॉसच्या घरात कोण कोणासोबत गेम खेळत आहे? यावर बोलताना नायरा म्हणाली, “गेम तर निक्की खेळत आहे. प्रेक्षकांना हे दाखवा की माझ्याबरोबर मुलगा चुकीचे वागतोय, त्याची गर्लफ्रेंड बाहेर आहे, तर तुम्हाला सहानुभूती मिळवता येते. पण, मुलाने सांगितले आहे की मी कमिटेड आहे. तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी करत आहात. ती आधी बिग बॉस हिंदीमध्ये होती, त्यामुळे तिला माहितेय की जनतेला आपल्या बाजूला कसे घ्यायचे आहे. निक्की चांगला गेम खेळत आहे. बाकी कोणाचा गेम बघून मला असे वाटले नाही की मजा आली.”
आता नायरा बिग बॉस मराठी ५ मध्ये येणार का? आणि ती आली तर काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd