Leeza Bindra Instagram Post: बिग बॉसच्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi 5) बाहेर पडलेला स्पर्धक अरबाज पटेल सध्या खूप चर्चेत आहे. अरबाजने बिग बॉसमध्ये जाण्याआधी तो कमिटेड आहे आणि लीझा बिंद्रा त्याची गर्लफ्रेंड आहे, असं म्हटलं होतं. बिग बॉसच्या घरात त्याची निक्की तांबोळीशी जवळीक वाढली. बिग बॉसमध्ये ‘दुर्गा’ मालिकेचे कलाकार आले होते, तेव्हा अरबाजला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आलं होतं. त्याने सर्वांसमोर तो कमिटेड असल्याची म्हणजेच बाहेर त्याची गर्लफ्रेंड आहे अशी कबुली दिली होती.

बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज एकत्र गेम खेळत होते, या प्रवासात दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर अरबाजने जिला गर्लफ्रेंड म्हटलं त्या लीझाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या होत्या. सुरुवातीला अरबाजबद्दल काहीच विचारू नका, असं ती म्हणाली होती. त्यानंतर काही दिवसांनी पोस्ट करून अरबाजबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, असं ती म्हणाली होती. आता अरबाज घराबाहेर आल्यावर त्याला याबाबत विचारण्यात आलं. त्यावर “अशी पोस्ट तिने टाकली आहे, हे मला माहीतच नाही, त्यामुळे नेमकं काय झालंय त्याची कल्पना नाही. तुम्ही गेमबद्दल विचारा ते मी सांगतो”, असं अरबाज म्हणाला.

Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

अरबाज पटेलच्या या मुलाखतींनंतर लीझा बिंद्राने पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. “या जगात काहीही पर्मनंट नाही, अगदी त्रासही नाही”, अशी पहिली स्टोरी लीझाने पोस्ट केली. लीझाने यापूर्वीही अरबाजबद्दल त्याच्या नाव न घेता पोस्ट केल्या आहेत.

leeza bindra nothing is permnant
लीझा बिंद्राची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

पुढे तिने दुसरी स्टोरी टाकली, ज्यात पोलीस तक्रारीचा उल्लेख आहे.
“तुम्हाला पोलीस तक्रारीचा अर्थ समजतो का?
तुम्ही सगळे मला त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करायला सांगत आहात, का करू? कशासाठी करू? नाही मला नाही करायची पोलीस तक्रार.
मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगतेय की तो चुकीचा माणूस नाही.
प्लीज त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा”, अशी स्टोरी लीझाने पोस्ट केली आहे.

leeza bindra police complain post
लीझा बिंद्राची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

“तिच्यासाठी माझ्या मनात…”, बिग बॉसच्या घराबाहेर येताच निक्कीबरोबरच्या नात्यावर अरबाज पटेलचं भाष्य; म्हणाला, “माझी चूक…”

लीझाने शेअर केला व्हिडीओ

या व्यतिरिक्त लीझाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तू मला खूप त्रास दिला आहेस, पण मी काहीच करू शकत नाही, मी सगळं देवावर सोडतेय अशा आशयाचे संवाद आहेत. ‘हे खरं आहे, असे कॅप्शन देत लीझाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, घराबाहेर आलेला अरबाज निक्कीबद्दल म्हणाला, “जे लोक मला निक्कीविषयी बोलत आहेत. तर मला वाटतं की ठीक आहे, जी मुलगी तुम्हाला आवडते, तिच्यासाठी तुम्ही काही गोष्टी करता त्यात चुकीचे काय आहे.”

Story img Loader