Arbaz Patel Nikki Tamboli in Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. त्यांच्यात प्रेम फुलत असल्याचं घरातील स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना वाटत होतं. पण अरबाजने तो सिंगल नसून कमिटेड आहे, म्हणजेच त्याची गर्लफ्रेंड आहे असं स्पष्ट केलं होतं. बिग बॉसच्या घरात अरबाज व निक्कीत (Arbaz Patel Nikki Tamboli) यांच्यातील ड्रामा सुरूच आहे, अशातच अरबाजच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

बिग बॉसच्या घरात सुरुवातीचे तीन आठवडे या दोघांची घट्ट मैत्री होती, इतकंच काय तर त्यांच्यात प्रेम फुलत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि निक्कीने घरात आदळआपट केली होती. मग त्यांनी भांडण सोडवलं आणि एकमेकांशी नीट वागायचं ठरवलं होतं. याचदरम्यान अरबाजने सिंगल नसून कमिटेड असल्याची कबुली दिली होती. त्याने एका मुलाखतीत त्याची गर्लफ्रेंड कोण आहे ते सांगितलं होतं. आता त्याच्या गर्लफ्रेंडने अरबाजचं नाव घेत पोस्ट केली आहे.

Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
bigg boss marathi riteish deshmukh announced elimination
“ज्यांना नारळ मिळणार ते घराबाहेर…”, रितेशच्या घोषणेनंतर जान्हवीला अश्रू अनावर; नेटकरी म्हणाले, “ही रडतेय म्हणजे अरबाज…”
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडचे नाव लीझा बिंद्रा (Leeza Bindra Post) आहे. लीझा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. लीझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. त्यात तिने अरबाजचा उल्लेख करत फॉलोअर्सना एक विनंती केली आहे. लीझाने स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे, त्यावर तिने लिहिलं “प्लीज मला अरबाजबद्दल मेसेज किंवा कमेंट करू नका”.

leeza bindra post about boyfriend arbaz patel
अरबाज पटेलची गर्लफ्रेंड लीझा बिंद्राची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

लीझा बिंद्राच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. लीझा व अरबाज पटेल बऱ्याच काळपासून सोबत आहेत. ते एकमेकांबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतात. पण बिग बॉसच्या घरात जे झालं आता लीझाने केलेल्या पोस्टवरून ती अरबाज पटेलशी ब्रेकअप करणार का, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

…अन् रितेशने घेतली अंकिताची फिरकी! आधी केला Eliminationचा प्रँक, नंतर सल्ला देत म्हणाला, “कॅप्टन्सी हलक्यात…”

अरबाज बिग बॉसच्या घरात गेल्यावर लीझाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टवर चाहते अरबाज व निक्कीचा उल्लेख करत कमेंट्स करायचे. यापैकी काही कमेंट्सना लीझा उत्तरं द्यायची. पण आता अरबाजसंदर्भात मेसेज किंवा कमेंट करूच नका असं चाहत्यांना तिने आवाहन केलं आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोठा ट्विस्ट! व्होटिंग लाइन्स बंद तरीही अंकिता घराबाहेर? रितेशने जाहीर करताच सर्वांना अश्रू अनावर; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

कोण आहे लीझा बिंद्रा?

Who is Arbaz Patel Girlfriend Leeza Bindra: लीझा ही मॉडेल व कंटेंट क्रिएटर आहे. लीझा व अरबाज दोघेही रिलेशनशिपमध्ये आहे. लीझाशी लवकरच करणार असल्याचं अरबाजने सांगितलं होतं. “सध्या मी रिलेशनशिपमध्ये आहे. तिच्याबरोबर मी सोशल मीडिया संदर्भातील कंटेट बनवायचो. तिचं नाव लीझा आहे. आम्ही दोघंही एकत्र खूप छान दिसतो. आमची उंची सुद्धा एकमेकांना साजेशी अशी आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे पण, आमचं लग्न झालेलं नाही. लवकरच लग्न करू,” असं अरबाज पटेल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.