अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) ही काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सहाव्या स्थानावरून नऊ लाख घेत तिने शो सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाचे मोठे कौतुकही झाल्याचे पाहायला मिळाले. जान्हवीने या शोमध्ये स्वत:ची ‘टास्क क्वीन’, अशी नवीन ओळख तयार केली. ती घरात असताना तिच्याबरोबर तिच्या कुटुंबीयांनादेखील टीकेला सामोरे जावे लागले. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

जान्हवी किल्लेकरने ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवीला विचारले की, तुझं एकविसाव्या वर्षी प्रेम जमलं आणि तू लग्न करण्याचा निर्णय घेतलास. अशा कोणत्या गोष्टी होत्या; ज्यामुळे हाच मुलगा योग्य आहे, असे तुला वाटले आणि तू लग्न करण्याचा निर्णय घेतलास, या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवीने म्हटले, “माझा नवरा उत्तम डान्सर होता आणि माझं डान्सवर प्रचंड प्रेम होतं. आम्ही डान्सच्या माध्यमातून भेटलो, प्रेम झालं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली होती. सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या. लग्न करून, मी त्याच्याबरोबर सुखात राहू शकते, यावर माझा विश्वास होता. आधी मम्मी-पप्पांचा विरोध होता; मात्र नंतर त्यांना पटलं. एखादे आई-वडील काय बघतात. त्याचं कुटुंब चांगलं आहे ना? त्याचं स्वत:चं घर आहे ना? तर याचं सगळंच चांगलं आहे. याचा मुरूडला बंगलादेखील आहे. माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये वयाचं अंतर आहे. त्याचं तेव्हा लग्नाचं वय होतं आणि माझं नव्हतं. तो लग्न करूयात म्हणाला. आई-वडिलांनीदेखील परवानगी दिली. पण, ते म्हणतात ना की, नशिबात काही गोष्टी लिहिलेल्या असतात. तर, कदाचित माझं करिअर लग्नानंतर घडणार असेल, असं काही माझ्या नशिबात असेल आणि तसंच झालं”, असे म्हणत जान्हवीने लग्नानंतर करिअरला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे.

bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Jahnavi Killekar
Video : माहेरी गेलेल्या जान्हवी किल्लेकरचं घरी ‘असं’ झालं स्वागत; तिच्या मुलाच्या कृतीनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “सोपं नाही महाराष्ट्राला…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव

हेही वाचा: ‘सिंघम अगेन’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, या मल्टिस्टारर सिनेमाचं एकूण बजेट किती? जाणून घ्या…

दरम्यान, जान्हवी किल्लेकर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती सतत पोस्ट शेअर करते. प्रेक्षकांचे तिला प्रचंड प्रमाणात प्रेम मिळत असल्याचे दिसते.आता ती कोणत्या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader