Bigg Boss Marathi 5 Grand Finale Promo: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पुन्हा एकदा रंगणार आहे. होय, बरोबर ऐकलंत तुम्ही. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या पर्वाचा फिनाले पुन्हा एकदा होणार आहे. कलर्स मराठीने प्रोमो शेअर करून फिनाले पुन्हा होणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच थरार अन् तोच कल्ला पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व २८ जुलैपासून सुरू झाले होते. यंदाच्या सीझनमध्ये फक्त थीमच नाही तर होस्टही बदलला. रितेश देशमुखने होस्ट केलेल्या या शोने टीआरपीचे रेकॉर्ड मोडले. मात्र तरीही हा शो १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत आटोपला. ६ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला आणि बारामतीजवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) शोचा विजेता ठरला. मात्र आता पुन्हा एकदा ग्रँड फिनाले होणार असल्याची घोषणा कलर्स मराठीने केली आहे.

bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant and her wife met yogita Chavan Nikhil damle
‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पत्नी शिल्पा सावंत फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ गाण्यावर अभिजीत सावंतने काढले भन्नाट सेल्फी! नेटकरी म्हणाले, “बाईSSS…”

कलर्स मराठीने एक धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे. ‘खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा तोच कल्ला, तोच थरार, बिग बॉसचा फिनाले पुन्हा रंगणार. २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर’, असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा – Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण

या व्हिडीओमध्ये निक्की तांबोळी, इरिना रुडाकोवा, धनंजय पोवार यांच्या डान्सची झलक पाहायला मिळतेय. तसेच आलिया भट्टदेखील मराठीत बोलताना दिसत आहे. होस्ट रितेश देशमुख दमदार डायलॉगबाजी करताना व्हिडीओत दिसत आहे. जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेऊन शो सोडला तो क्षण, टॉप ३ मधून टॉप २ सदस्य निवडतानाचा क्षण अन् सूरज चव्हाणने ट्रॉफी जिंकली ते क्षण या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : “ट्रक उलटून माझा मृत्यू झाला तर…”, घोडबंदर मार्गाने प्रवास करणारा अभिनेता संतापला; म्हणाला, “घाणेरड्या रस्त्यांमुळे…”

बिग बॉसच्या घरात होते हे १७ स्पर्धक

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. त्यानंतर संग्राम चौगुले वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आला होता. या सर्व सदस्यांपैकी सूरज चव्हाणने बाजी मारली आणि त्याने ट्रॉफी जिंकली.

Story img Loader