Bigg Boss Marathi5 च्या घरात सदस्य दररोज कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली मजामस्ती यांमुळे बिग बॉसच्या घरातील सदस्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या प्रोमोमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना कॅप्टनचे पद मिळविण्यासाठी एक टास्क दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
bigg boss marathi ankita fight with chota pudhari
Video : “दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा…”, अंकिता घन:श्यामवर प्रचंड भडकली! ‘बिग बॉस’च्या घरातील नवा प्रोमो चर्चेत
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
bigg boss marathi nikki tamboli statement on varsha usgaonker motherhood
“वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य?”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मोठा वाद; माफी मागूनही नेटकरी संतापले…
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
jay dudhane utkarsh shinde in bigg biss marathi
Video: Bigg Boss Marathi मध्ये येणार आधीच्या पर्वातील दोन दमदार स्पर्धक, योगिताचा पती म्हणाला, “आता खरा कल्ला होणार…”

‘कलर्स मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य एकत्र जमा झाले आहेत. बिग बॉसने या सदस्यांना टास्क दिला आहे. या टास्कमध्ये दोन गट असणार आहेत. टीम ए आणि टीम बी, असे हे गट आहेत. या दोन्ही टीमसाठी दोन बोटी दिल्या आहेत. या बोटीत बसून मोती शोधायचे असून, कॅप्टनच्या पदाच्या उमेदवारांना बाजूला करायचे आहे, असे या टास्कचे स्वरूप आहे.

कॅप्टनच्या पदासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ

प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे एका मोठ्या बॉक्समध्ये हे मोती आहेत आणि ते घेण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ दिसत आहे. त्याबरोबरच हे सदस्य एकमेकांना अडवत असून दुसऱ्या टीमने टास्क पूर्ण करू नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांत पुन्हा भांडण झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रोमोच्या शेवटी अभिजीत सावंतला दुखापत झाल्याचे पाहायला मिळते.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

आता कोणत्या टीममध्ये कोणता सदस्य असणार, कोणती टीम हा टास्क जिंकत कॅप्टनच्या पदाची उमेदवारी मिळवणार आणि प्रेक्षकांना कोणाचा खेळ आवडणार हे संपूर्ण भाग प्रदर्शित झाल्यावर पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच अभिजीत सावंतला दुखापत कशी झाली, हेदेखील बिग बॉसच्या संपूर्ण एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: ठरलं तर मग : जुन्या रुपात अवतरली प्रतिमा! भावुक होत पूर्णा आजीने चक्क सायलीलाच बांधली राखी; नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो

दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वात पहिली कॅप्टन ही अंकिता वालावलकर झाली होती. आता या पर्वात दुसरा कॅप्टन कोणता सदस्य होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले होते. बिग बॉसच्या खेळात कॅप्टन पद अतिशय महत्त्वाचे मानले जाते. कारण- कॅप्टन असलेल्या व्यक्तीकडे विशेषाधिकार असतात. त्याला घरातील निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात. त्यामुळे ज्या टीममधील सदस्य कॅप्टन होईल, त्या टीमलादेखील त्याचा फायदा होतो. आता कोणता सदस्य कॅप्टनचे पद आपल्या नावावर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.