Bigg Boss Marathiचे पाचवे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडनंतर तिसऱ्या आठवड्याची सुरुवात निक्की तांबोळीच्या भांडणाने झालेली पाहायला मिळाली आहे. तिने इतर सदस्यांचे कपडे फेकत धक्काबुक्की केल्याचे पाहायला मिळाले होते. बिग बॉसच्या घरात दररोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला असून बिग बॉसच्या घरातील दोन सदस्यांना पॉवर कार्ड मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये अरबाज पटेल आणि अभिजित सावंत या दोन सदस्यांना पाच पॉवर कार्ड दिली आहेत.

प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत एका खोलीत आहे. त्यांच्यापुढे पॉवर कार्ड ठेवले आहेत. बिग बॉस त्यांना म्हणतात की, अरबाज आणि अभिजित आपल्यासमोर पाच पॉवर कार्ड आहेत. त्यानंतर अभिजित मी हे पॉवर कार्ड सेफसाठी वापरतो असे म्हणताना दिसतो. तर त्यानंतर अरबाजदेखील मी हे कार्ड सेफसाठी वापरणार असल्याचे म्हणतो. त्यांच्या या विधानानंतर स्क्रीनसमोर बसलेल्या बिग बॉसच्या घरातील बाकी सदस्यांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव पाहायला मिळत आहेत. मात्र नक्की त्यांनी काय निर्णय घेतले आहेत, हे पाहायला मिळत नाही.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

आता या दोघांनी वापरलेल्या पॉवर कार्डमुळे घरातील इतर सदस्यांवर काही परिणाम होणार का, घरातील समीकरण बदलणार का आणि घरातील सदस्यांच्या मैत्रीवर काय परिणाम होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबरोबरच, घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. या टास्कदरम्यान दोन टीममध्ये मोठी भांडणे झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे बिग बॉसने दोन्ही टीमने भावनाशून्य होत हा खेळ खेळल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मीही आता भावनाशून्य होणार असल्याचे बिग बॉसने म्हटल्याचे एका प्रोमोमध्ये पाहायला मिळाले.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : अंकिता, धनंजय यांना अजूनही अभिजीत सावंतवर आहे डाउट, गॉसिप करताना म्हणाले, “आपलंच नाणं खोटं…”

दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील दुसऱ्या आठवड्यातील भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने अनेक सदस्यांची त्यांच्या वागणुकीबद्दल कानउघडणी केल्याचे पाहायला मिळाले. महत्वाचे म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. आता या आठवड्याच्या शेवटी कोणाला बोलणी खावी लागणार आणि कोणत्या सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता या पॉवर कार्डमुळे बिग बॉसच्या घरात कोणते बदल होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.