Bigg Boss Marathi 5 वे पर्व सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे. सतत कोणत्या ना कारणाने बिग बॉसच्या घरातील सदस्यांची चर्चा होत असते. -बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे व्यक्त होणे, खेळ खेळणे, इतर सदस्यांविषयी बोलणे यांसाठी ते ज्या पद्धतींचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या कृतींचे पडसाद बाहेरच्या जगात उमटताना दिसतात. प्रेक्षक, कलाकार मंडळी, आधीच्या पर्वातील स्पर्धकही त्यावर व्यक्त होताना दिसतात.

काय म्हणाली मीनल?

आता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या मीनल शाहने एका मुलाखतीत घरातील सदस्यांवर वक्तव्य केले आहे. मीनल शाहने ‘स्टार मीडिया मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत घरातील सदस्यांना तू काय सल्ला देशील? यावर उत्तर देताना मीनल म्हणाली, “मी निक्कीला सांगेन की, तुझा गेम बोअरिंग झालाय. आम्ही हिंदी बिग बॉसचे एपिसोड्सदेखील पाहिले आहेत. ती एकाच व्यक्तीला टार्गेट करते आणि फक्त किरकिर करीत राहते. तू तुझे शब्द चांगले वापर आणि चांगल्या पद्धतीने खेळ. टास्कमध्ये गेम प्लॅनिंग तू खरंच चांगलं करतेस; पण नियम तोडून टास्कची वाट लावतेस, तर तसं करू नकोस. हाच सल्ला मी तिला देईन. वैभवला मी सांगेन की, तू घरी जा.”

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…
Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel got upset when Nikki and Abhijeet were announced as the popular couple
Video: ‘बिग बॉस’ची ‘ती’ घोषणा ऐकताच अरबाज पटेलचा पडला चेहरा, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात पुन्हा एंट्री, पण ‘तो’ एक सदस्य गैरहजर; नेटकरी म्हणाले…

पुढे बोलताना मीनलने म्हटले, “सूरजला मी म्हणेन की भाऊ तू मस्त खेळ. काय होतं की, लोक सूरजला म्हणतात की तू खेळ आणि तो जेव्हा खेळायला लागतो, तेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवतात. मी तर म्हणते सूरज बिनधास्त खेळ. आम्ही प्रेक्षक तुझ्याबरोबर आहोत. जान्हवीला मी सांगेन की, तुला खरं बनायचं आहे, तर तू हृदयापासून बन; फक्त खेळासाठी बनू नकोस. जर तुला लोकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल, तर खरी राहा आणि जिथे चुकीचं आहे तिथे उभी राहा. विनाकारण निक्कीशी भांडण्यात काही अर्थ नाहीय. “

हेही वाचा: Video: “अपनी औलाद को सुधारो…”, निक्की तांबोळीच्या आईला मराठी अभिनेत्रीचा सल्ला, म्हणाली, “वर्षाताईंना अपशब्द वापरले…”

“वर्षाताईंना सांगेन की, तुम्ही अजून खुलून खेळा. अरबाजला सांगेन की, राग थोडा कमी कर. मला वाटतं की, अरबाज आणि संग्रामचं एक दिवस भांडण होईल आणि कोणी ना कोणी बाहेर जाईल. या प्लॅटफॉर्मवर रागाशिवाय इतर गुणही दाखवले पाहिजेत. अंकिता, अभिजीत, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, संग्राम हे सदस्य आपला गेम आणखी सुधारू शकतात.” असे म्हणत मीनलने प्रत्येक सदस्याला सल्ला दिला आहे.

दरम्यान, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला कानाखाली मारल्यामुळे आर्याला घराबाहेर जावे लागले आहे. आता येत्या काळात बिग बॉसच्या घरात नक्की काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.