Bigg Boss Marathi 5 वे पर्व सध्या मोठ्या चर्चेत असलेले पाहायला मिळते. अनेक कारणांमुळे कलाकारांची चर्चा होताना पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात होणारी भांडणे, एकमेकांविषयी केलेली वक्तव्ये यामुळे हे स्पर्धक मोठ्या चर्चेत असल्याचे दिसते. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धकांचे वागणे त्या घरापुरते मर्यादित न राहता, त्याचे पडसाद बाहेरच्या जगावरही उमटताना दिसतात. या स्पर्धकांचा खेळ, त्यांची वक्तव्ये यांवर प्रेक्षक, कलाकार आणि आधीच्या पर्वातील स्पर्धक वक्तव्य करीत असल्याचे पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या मीनल शाहने जान्हवीच्या खेळाबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.

काय म्हणाली मीनल?

मीनल शाहने नुकतीच ‘स्टार मराठी मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला जान्हवी किल्लेकरच्या खेळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अगोदरची आणि आताची जान्हवी यामध्ये काय फरक वाटतोय? एकंदरीत जान्हवीबद्दल तुझं मत काय आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “जान्हवीने वेळेत पलटी मारली, हे खूप चांगलं झालं. सुरुवातीला ती खूपच नकारात्मक वाटत होती. मला वाटतं की, जान्हवीला निक्कीच्या विरुद्ध खेळण्यासाठी टाकलं होतं; पण त्या एकत्र आल्या आणि त्यामुळे सुरुवातीचे एपिसोड खूपच निगेटिव्ह झाले. मला एपिसोड पाहावेसेच वाटत नव्हते.

Shilpa Shirodkar, Shehzada Dhami And More Actors Confirm Their Appearance In Bigg Boss 18 watch promo
Bigg Boss 18 : एक ९०च्या दशकातील सेन्सेशनल क्वीन, तर दुसऱ्याला निर्मात्याने सेटवरून दाखवलेला बाहेरचा रस्ता; वाचा स्पर्धकांची नावं
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Bigg Boss Marathi 5 aarya jadhao praised suraj chavan
Bigg Boss Marathi तील सर्वात खरा स्पर्धक कोण? आर्या जाधव ‘या’ सदस्याचे नाव घेत म्हणाली, “शोच्या सुरुवातीपासून…”
Nikki Tamboli
“तुझा गेम बोअरिंग…”, आधीच्या पर्वातील स्पर्धकाचा निक्कीला सल्ला; इतर सदस्यांबाबत केलेले वक्तव्य चर्चेत
bigg boss marathi third season contestant praise arbaz patel game
“संग्रामची शक्ती खूप कमी पडली…”, अरबाजच्या युक्तीचं आणि खेळाचं पहिल्यांदाच कौतुक; तिसऱ्या पर्वातील सदस्याची पोस्ट चर्चेत
Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki
आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”
Bigg Boss Marathi 5
Video : संग्राम चौगुलेकडून ‘या’ सदस्याचे त्याच्या खेळासाठी कौतुक; म्हणाला, “फोकसमध्ये…”
bigg boss marathi genelia sends ukdiche modak to house contestant
Video : ‘बिग बॉस’च्या घरात जिनिलीयाने पाठवले उकडीचे मोदक! सगळे झाले खूश पण, सूरजच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

तुम्हाला कोण आवडत नाही, हा प्रश्न विचारल्यावर त्यामध्ये जान्हवीचं नाव सर्वांत आधी होतं. प्रेक्षक आणि कलाकारांनादेखील जान्हवी ही नकोच होती. पण बरंय की, जान्हवीनं तिचा खेळ बदललाय. पण, मला असं वाटतं की, तिची प्रतिमा जी तयार झालीय, ती सुधारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मी आशा करते की, ती सकारात्मकरीत्या बदलेल. पण तिचं असं होतं की, ती प्रयत्न करते; मात्र पुढे-मागे तिचा गेम घसरतोच. बघूया ती पुढे काय करते? प्रामाणिकपणे सांगायचं, तर मला ती वैयक्तिकरीत्या एवढी काही आवडत नाही.”

हेही वाचा: Munawar Faruqui : बिग बॉस विजेत्या मुनव्वर फारुकीला ठार मारण्याची धमकी, तडकाफडकी ‘या’ ठिकाणी रवाना

मीनल शाह ही बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. तिच्या खेळामुळे ती सातत्याने चर्चेत होती.
याबरोबरच महेशसर बिग बॉससारख्या शोसाठी परफेक्ट आहेत. त्यांना माहितेय की, स्पर्धकांना कसं सरळ करायचं आहे. महेशसरांच्या चावडीमध्ये धमाल असायची. त्याची आठवण येते, असे म्हणत मीनल शाहने आपले मत व्यक्त केले आहे.

आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आणखी काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.