Bigg Boss Marathi 5 Press Conference: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या खूप गाजत आहे, सगळीकडे याच शोची चर्चा पाहायला मिळत आहे. या शोला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळत आहे. या आठवड्यात झालेल्या कॅप्टन्सी टास्कनंतर अरबाज पटेल (Arbaz Patel) दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन झाला, तर वर्षा उसगांवकरांनी (Varsha Usgaonkar) बी टीम सोडली आहे. त्यामुळे आज भाऊच्या धक्क्यावर काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. अशातच आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे.
आज शोमधील स्पर्धकांना भाऊचा धक्का नाही, तर महाराष्ट्राच्या धक्क्याला सामोरं जावं लागणार आहे. बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली आहे. त्यामुळे घरातील स्पर्धकांना मराठी पत्रकार प्रश्न विचारताना दिसणार आहेत. या प्रश्नाला स्पर्धक काय उत्तरं देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा – तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…
स्पर्धकांना विचारण्यात आलेले प्रश्न
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की स्पर्धकांना थेट प्रश्न विचारले जातात. डीपीला विचारण्यात येतं की ‘तुम्हाला अभिजीतचा इश्यू आहे का?’ त्यानंतर अरबाजला त्याच्या व निक्कीबद्दल ‘शो संपल्यानंतर निक्कीशी नातं तसंच राहणार का?’ असा प्रश्न विचारण्यात येतो. जान्हवीला तिच्याकडून काय चुकलं असं विचारण्यात येतं. तर ‘सूरजला तू गेम कधी दाखवणार,’ असा सवाल करण्यात आला. त्यानंतर निक्कीला अरबाजबद्दल प्रश्न केला जातो. ‘तुला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून जाईल आणि आता आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे’? या सर्व प्रश्नांची उत्तरं हे स्पर्धक काय देतात? ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – ५३ दिवसांनी वर्षा उसगांवकरांनी गेम बदलला! निक्कीशी हातमिळवणी करत ‘टीम B’मधून एक्झिट, नेटकरी म्हणाले…
दरम्यान, बिग बॉस मराठीचा हा प्रोमो पाहून निक्की-अरबाजला दत्तक घेतलंय का? असा प्रश्न बिग बॉसला विचारा, या आठवड्यात अरबाज १०० टक्के बाहेर जाणार, वर्षाताईंनी स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतला आहे. B टीम सोडून…..कॅप्टन टास्क मध्ये अरबाजला कॅप्टन बनण्यासाठी सपोर्ट केल्यामुळे स्वतः कॅप्टन झाल्या नाहीत. या आठवड्यामध्ये अरबाज बाहेर जाणार नाही कारण तो कॅप्टन आहे. घराबाहेर जाणारी व्यक्ती वर्षाताई आहे. अशा कमेंट्स यावर नेटकरी करत आहेत.