Bigg Boss Marathi 5 वे पर्व सतत कोणत्या ना कोणत्या ना कारणाने चर्चेत असते. कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे तर कधी बिग बॉसने दिलेल्या टास्कमुळे हे पर्व चांगलेच गाजताना दिसते. आता मात्र बिग बॉसच्या घरातील एका व्हिडीओची चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ कलर्स मराठीने सोशल मीडियाच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये घरातील काही सदस्य एकत्र बसले असून सूरज चव्हाणला काहीतरी सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला, सूरज चव्हाण(Suraj Chavan) धनंजय पोवारला सॉरी म्हणताना दिसतो. त्यावर धनंजय, "सॉरी नाही, कंट्रोल कर. तुला हे ही सांगतो, उद्या आमच्यात खेळत असताना समोर अरबाज, वैभव कोणीही असू देत तरीही असा खेळू नकोस. मला राग तू तिकडून असा खेळलास याचा नाही." असे धनंजय त्याला म्हणतो. त्यावर अभिजीत म्हणतो, "राग, ताकद असते ना, त्यावर कंट्रोल करणं महत्वाचे आहे. आता हळूहळू तुला कळेल." याला धनंजय सहमती दर्शवतो. तितक्यात पंढरीनाथ कांबळे म्हणतो, "तिथे आपले पण होते आणि त्यांचे पण होते. कोणालाही लागलं असतं." धनंजय म्हणतो की, आपले किंवा त्यांचे असं खेळलं नाही पाहिजे. https://www.instagram.com/reel/C-rhgxkyFlN/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== कसर्ल मराठी इन्स्टाग्राम यानंतर अभिजीत सावंत धनंजयला म्हणतो, "नका बोलू." त्यावर धनंजय पोवार म्हणतो, "एवढं काय मी शिव्या देत नाहीए की जोड्याने हाणत नाहीए." त्यावर अभिजीत आणि पंढरीनाथ म्हणतात," कळलंय त्याला." धनंजय म्हणतो, "मग विषय तुम्हीच बंद करा. हा नवीन विषय काढणार. तुम्ही वेगळं बोलणार." त्यानंतर अभिजीत त्याला म्हणतो, "किती रागवता तुम्ही." तिथे बसलेली अंकिता सगळ्यांना 'झालं झालं' असं म्हणत शांत राहायला सांगते. हेही वाचा: Video: “प्रवासाला येताय ना?”, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “जबरदस्त” दरम्यान, घरातील सदस्यांमधील हा संवाद कॅप्टन पदाच्या टास्कनंतरचा आहे. या टास्कवेळी सुरू असलेल्या भांडणात सूरज अचानक त्यांच्यामध्ये गेलेला दिसला. आता घरातील सदस्यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर सूरज आपल्या खेळात काय बदल करणार, या आठवड्याच्या शेवटी 'भाऊचा धक्का' या एपिसोडमध्ये रितेश देशमुख त्याच्या खेळावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे आहे. याबरोबरच, सध्या घरातील कॅप्टन पदासाठी आयोजित केलेल्या टास्कची मोठी चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातील पहिली कॅप्टन अंकिता वालावलकर होती. आता दुसऱ्या आठवड्यात कोणता सदस्य कॅप्टन पद आपल्या नावावर करणार हे पाहणे, उत्सुकतेचे असणार आहे.या आठवड्याच्या शेवटी कोणता सदस्य घराला निरोप देणार, हे पाहणेदेखील महत्वाचे असणार आहे.