Bigg Boss Marathi 5वे पर्व पहिल्या दिवसापासून विविध कारणांमुळे गाजत आहे. आता मात्र हे पर्व चर्चेत असण्याचे कारण म्हणजे घरात वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर संग्राम चौगुलेचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. घरातील कोणत्या सदस्याविषयी त्याला काय वाटते, टॉप ५ मध्ये कोणते स्पर्धक असतील याबद्दल त्याने सांगितले आहे.

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने संग्राम चौगुलेची ओळख करून दिली. त्याबरोबरच त्याला टॉप ५ मध्ये कोणते स्पर्धक असतील आणि ज्यांची नावे घेतली आहेत, ते वरच्या स्थानावर का असतील याची कारणही विचारले आहे.

aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
Bigg Boss Marathi 5
Video: “…तर माझं नाव बदल”, संग्राम चौगुलेच्या ‘त्या’ कृतीमुळे निक्कीचा संताप अनावर; पाहा नेमकं काय घडलं
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
Bigg Boss Marathi season 5 Abhijeet Kelkar share post on Sangram Chougule entry
“खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli And Arbaz Patel in Danger zone, janhvi, suraj varsha usgaonkar safe
Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो

रितेश देशमुखच्या या प्रश्नावर अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अरबाज पटेल व जान्हवी किल्लेकर हे पाच स्पर्धक अनुक्रमे टॉप ५ मध्ये असतील, असे संग्रामने म्हटले आहे. स्पर्धकांना दिलेल्या क्रमांकाबद्दलची कारणे सांगताना संग्राम म्हणतो की, अभिजीत दोन्ही टीमला सांभाळून चालला आहे. दोन्ही टीममधील स्टॅट्रेजी त्याला कळतात. टीम एमध्ये जहालवादी माणसं आहेत, फक्त त्यांच्यात भांडखोरपणा आहे; पण स्टॅट्रेजी चांगल्या आहेत. टीम बीमधील माणसं भावनिक आहेत. अभिजीतला भावना सांभाळता येतात आणि ज्यावेळी त्याला वाटतं की, आपल्याला काहीतरी धोका आहे, त्यावेळी निक्कीला समोर करून त्याला स्वत:ला वाचवता येतं. त्यामुळे तो पहिल्या स्थानावर येईल, असं मला वाटतंय.

कलर्स मराठी इन्स्टाग्राम

निक्की तांबोळीविषयी संग्राम म्हणाला की, कोणी वंदा, कोणी निंदा; कॅमेऱ्यासमोर दिसणं हाच माझा धंदा, असं तिचं आहे. त्यामुळे ती दुसऱ्या स्थानावर येईल. सूरजला महाराष्ट्राच्या जनतेचा पाठिंबा आहे. त्याचं काम चांगलं आहे, त्याची कामं तो चांगल्या पद्धतीनं करतो. फक्त त्याला लवकर गेम कळत नसल्यानं तो मागे पडतो कधी कधी. परंतु, तो तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारेल, असं मला वाटत आहे.

अरबाज पटेलबद्दल बोलताना संग्राम म्हणाला की, आता ज्या गोष्टी स्क्रीनवर चालल्या आहेत, त्या मलाच नाही, तर कोणालाच आवडत नाहीयेत. हा रिअॅलिटी शो आहे. कुठल्याही एका शोसाठी आपण काहीही करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन लोकांना काय दाखवणार आहोत, हे बघितलं पाहिजे. पण, त्याचं फॅन फॉलोईंग जास्त असल्यानं तो चौथ्या स्थानी येऊ शकेल, असे मला वाटते.

हेही वाचा:Bigg Boss Marathi : शिवरायांचा जयघोष करत संग्राम चौगुलेची घरात एन्ट्री! आर्या लाजली, तर अरबाज-निक्की…; पाहा प्रोमो

पाचव्या स्थानासाठी त्याने जान्हवी किल्लेकरचे नाव घेतले. कारण सांगताना तो म्हणाला की, जान्हवीनं पाच आठवडे घालवले आहेत. आता ती कमबॅक करीत आहे. आता ती एकटीच अशी आहे, जी निक्कीला थांबवू शकते.

काय म्हणाले नेटकरी?

संग्रामने टॉप ५ मध्ये ज्या स्पर्धकांची नावे घेतली आहेत, त्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “विरुद्ध नावं घेतली आहेत टॉपमध्ये, सूरज आणि अभिजीत सोडून. कळले तुझे विचार. महाराष्ट्राला अपेक्षा आहेत तू टीम बीकडून खेळावं.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “२९ चा पुन्हा एकदा रिचार्ज वाया घालवणार हा”, आणखी नेटकऱ्याने, “पैसा बरबाद” असे लिहीत संग्रामच्या क्रमवारीवर नाराजी व्यक्त केली आहे.

आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील कोणती समीकरणे बदलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.