Bigg Boss Marathi 6 Fame Ayush Sanjeev : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर घरातून दोन स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत. आयुष संजीव आणि करण सोनावणे या दोन्ही स्पर्धकांकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण, यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास महिन्याभरातच संपला आहे. घरात असताना करणचे रुचिताशी अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, आयुष संजीवबद्दल रुचिताने केलेलं एक वक्तव्य सर्वत्र तुफान चर्चेत आलं होतं.

आयुष-तन्वीच्या जोडीला रुचिताने लव्ह अँगल म्हटलं होतं. तसेच आयुषची बाहेर गर्लफ्रेंड आहे, तो कमिटेड आहे अशी चर्चा सुद्धा टोळीतील सदस्यांमध्ये झाली होती. यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली ती म्हणजे आयुषची गर्लफ्रेंड नेमकी आहे तरी कोण? अभिनेता नेमका कोणाला डेट करतोय?

तन्वी आयुषच्या मैत्रीसाठी अनेकदा रडताना दिसली. पण, आयुषने ही केवळ मैत्रीचं असल्याचं अनेकदा सांगितलं. याशिवाय घराबाहेर पडल्यावर या शोमध्ये करण, प्राजक्ता आणि सचिन हे तीन मित्र भेटले असं आयुष म्हणाला.

आयुष गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी साळवीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. चिन्मयी ‘वागळे की दुनिया’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली.

chinmayee ayush
चिन्मयी साळवी-आयुष संजीव

चिन्मयी आणि आयुष यांनी एकत्र फोटो देखील शेअर केले आहेत. मात्र, या दोघांनीही कधीच रिलेशनशिपमध्ये असल्याचं मान्य केलेलं नाही. आयुष ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यावर चिन्मयी न चुकता त्याला व्होटिंग करा असं आवाहन चाहत्यांना करत होती. यावेळी आयुषचा उल्लेख तिने जवळचा मित्र असा केला होता.

याशिवाय ‘बिग बॉस’मधून आयुष बाहेर आला यावेळी त्याच्या मित्रमंडळीनी घरगुती सेलिब्रेशन केलं होतं. ओमकार राऊत आणि आयुषने एकत्र केक कापला. या व्हिडीओमध्ये देखील चिन्मयी पाहायला मिळतेय. भाऊच्या धक्क्यावर आयुष-तन्वीने ‘मितवा’ गाण्यावर डान्स केला होता. यावर सुद्धा चिन्मयीने खास कमेंट केली आहे. यावरून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

ayush
आयुष-तन्वीच्या डान्सवर चिन्मयीची कमेंट

दरम्यान, चिन्मयीबद्दल सांगायचं झालं तर, ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. ‘तू माझा सांगती’, ‘छोटी मालकीन’ अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय तिने “ढोलकीच्या तालावर…” हा डान्सिंग शो सुद्धा गाजवला होता.