Bigg Boss Marathi 6 Eviction: ‘बिग बॉस मराठी’मध्ये या वीकेंडला पाचव्या आठवड्याचं एव्हिक्शन पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात शोमधून दिव्या शिंदेला निष्कासित करण्यात आलं होतं. यानंतर प्रेक्षकांच्या मतांनुसार ओमकार राऊतची एक्झिट झाली. नुकतेच घरातून दोन जण बाहेर गेले होते. त्यामुळे या वीकेंडला काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता घरातील फक्त सहा सदस्य नॉमिनेट होते.

अखेर समोर आलेल्या माहितीनुसार आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार या आठवड्यात सुद्धा डबल एव्हिक्शन झालं आहे. आयुष संजीव पाचव्या आठव्यात शोमध्ये कुठेच दिसला नव्हता. खरंतर घरात राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर जे सदस्य कुठेच दिसत नव्हते ते सुद्धा कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू लागले होते. पण, आयुषच्या बाबतीत असं घडलं नाही. त्याचा कोणत्याही टास्कमध्ये सहभाग नव्हता, ना कोणत्या भांडणात. त्यामुळे आयुष यावेळी घराबाहेर होणार किंवा त्याला आता गेममधून काढा असं प्रेक्षक स्वत:च कमेंट्समध्ये सांगत होते. त्याची प्रकृती सुद्धा ठिक नव्हती.

यानुसार आयुष संजीवची अखेर या वीकेंडला घरातून एक्झिट झाल्याची माहिती समोर आली आहे. पण, डबल एव्हिक्शन असल्याने घराबाहेर जाणारा दुसरा सदस्य नेमका कोण आहे? त्याचं नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

सोशल मीडिया स्टार करण सोनावणे ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर गेल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. करणचा प्रवास इतक्या लवकर संपलाय हे ऐकून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. आता करणची खरंच एक्झिट झालीये की या सगळ्या अफवा आहेत हे भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.

करण व आयुषच्या एव्हिक्शनबद्दल ‘कलर्स मराठी’ किंवा ‘बिग बॉस मराठी’ने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख नेमकं कोण घराबाहेर जाणार हे जाहीर करणार आहे.

दरम्यान, करण घराबाहेर गेल्याची चर्चा सुरू झाल्यावर अनेकांनी त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं असणार असा अंदाजही व्यक्त केला आहे. आता करणच्या बाबतीत नेमकं काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.