Bigg Boss Marathi 6 Contestant Promo : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा कोण-कोण एन्ट्री घेणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. ‘कलर्स मराठी’कडून आता स्पर्धकांची झलक दाखवणारे लहानसे प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. यावरूनच घरात कोणकोणते सेलिब्रिटी एन्ट्री घेऊ शकतात याचा अंदाज सर्वांना हळुहळू येत आहे.

गेल्यावर्षीच्या सीझनमध्ये प्रेक्षकांना कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्स, इन्फ्लुएन्सर्स देखील पाहायला मिळाले होते. अगदी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सुद्धा रीलस्टार आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही घरात सेलिब्रिटींच्या जोडीला इन्फ्लुएन्सर्स, रीलस्टार्स पाहायला मिळतील का? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.

अखेर नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोनुसार घरात धुमाकूळ घालायला येणारा ‘तो’ दुसरा-तिसरा कोणी नसून प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार focused indian आहे असा अंदाज नेटकऱ्यांनी प्रोमो पाहून वर्तवला आहे.

Award Banner

‘कलर्स मराठी’ने प्रोमो शेअर करताच ‘फोकस इंडियन’ करण सोनावणे यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेणार अशा चर्चा सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झाल्या आहेत. प्रोमोमधील डान्स, एकंदर शरीरयष्टी पाहून हा करण आहे अशा कमेंट्स प्रोमोवर करण्यात येत आहेत. फोकस इंडियनचे ‘सोनावणे वहिनी’ या कॅरेक्टरचे रील्स व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत असतात. करण हा ऑरेंज ज्युस गँगचा सदस्य आहे. करण सोनावणेसह सिद्धांत सरफरे, जस्ट नील थिंग्स असे सहा क्रिएटर्स या ऑरेंज ज्युस गँगचे मेंबर आहेत.

bigg boss marathi focus indian karan sonawane
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, आता सोशल मीडियावरील चर्चेनुसार खरंच करण घरात प्रवेश करणार की नाही? याबाबतची अधिकृत घोषणा रितेश देशमुख ११ जानेवारीला करेल. याशिवाय चॅनेलकडून आणखी एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. “राजकीय वर्तुळात तर खूप भूकंप केलेत, आता बिग बॉस मराठीच्या घरात ब्लास्ट करण्यासाठी हा धुरंधर येतोय!” मात्र, या स्पर्धकाचा प्रोमो शेअर केलेला नाहीये. केवळ त्याच्या एन्ट्रीची हिंट देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील ही व्यक्ती नेमकी कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल.