Bigg Boss Marathi 6 Day 24 Updates : बिग बॉस मराठीच्या चौथ्या आठवड्यात नॉमिनेशननंतर घरातील समीकरणं बदललेली पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने २४ व्या दिवसाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विशाल कोटियन व प्रभू यांच्यात जोरदार भांडण झालं आहे.

विशाल प्रभूला म्हणतो की “तू माझ्यासाठी फार महत्त्वाचा नाहियेस.” त्यावर प्रभूची रिअॅक्शन पाहण्यासारखी असते. नंतर “तू नॉमिनेटेड आहेस मला तुझ्याकडून फुटेज नको,” असं म्हणत विशाल प्रभूला डिवचतो. प्रभू चिडतो आणि म्हणतो, “मी थांबत नसतो, डॉन म्हणत्यात मला. हलक्यात घ्यायचं नाही. दुसऱ्याची वाट लावूनच मी बाहेर जाणार.”

एकूणच प्रभू व विशालच्या भांडणामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. आदल्या दिवशीच्या नॉमिनेशन टास्कमध्येही दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर पुन्हा दोघे भिडले, त्यामुळे त्यांच्या भांडणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या आठवड्यात ओमकार राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, प्रभू शेळके, दिपाली सय्यद, अनुश्री माने, दिव्या शिंदे, रोशन भजनकर, राकेश बापट हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

Live Updates
11:34 (IST) 3 Feb 2026

कॅप्टन्सी टास्कमध्ये करण सोनावणे भडकला, पाहा व्हिडीओ

बिग बॉस मराठी ६ कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो आला समोर

https://www.instagram.com/reel/DUSLrLeCPLk/?utm_source=ig_web_copy_link