Bigg Boss Marathi 6 Double Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून ११ व्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या आठवड्यात दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारंडे, संकेत पाठक असे सात स्पर्धक नॉमिनेट होते. शो सुरू झाल्यापासून दर वीकेंडला एक-एक स्पर्धक घराबाहेर जातोय. पण, यावेळी घरातील सदस्यांना एक मोठा धक्का बसणार आहे. कारण, ‘बिग बॉस’च्या घरातून या आठवड्यात एक नव्हे तर दोन स्पर्धक बाहेर जाणार आहेत.

रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर याची हिंट सर्वांना दिली. डबल एव्हिक्शनचा निर्णय ऐकून सगळेच सदस्य शॉक झाले होते. याचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. रितेश म्हणाला, “या आठवड्यात दोन एव्हिक्शन होतील. दोन जणांपैकी एक जण काटा गँगमधला आहे आणि दुसरा टोळीतला आहे. त्यातील पहिलं एव्हिक्शन आज होईल…काटा गँगमधील एक सदस्य बाहेर जाईल.” यानंतर तन्वी ढसाढसा रडताना या प्रोमोमध्ये दिसतेय. त्यामुळे छोटा डॉन प्रभू शेळके घराबाहेर झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मात्र, प्रभूबरोबर घराबाहेर जाणारा दुसरा सदस्य कोण आहे? त्याचं नावंही आता सोशल मीडियावर रिव्हिल झालं आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक संकेत पाठक या आठवड्यात घराबाहेर होणारा दुसरा स्पर्धक असेल.

Award Banner

आता प्रभू शेळके आणि संकेत पाठक यांच्या एव्हिक्शननंतर घरात काय बदलणार? तन्वी तिचा मानलेला भाऊ प्रभू बाहेर गेल्यामुळे वीक होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तन्वी कोलते घराची कॅप्टन आहे. या सीझनमध्ये ती दुसऱ्यांदा कॅप्टन झालेली आहे.

दरम्यान, प्रेक्षकांच्या या डबल एव्हिक्शनवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी संकेत चांगला गेम खेळत होता…त्याला उगाच बाहेर काढलं अशा कमेंट्स सोशल मीडियावर दिल्या आहेत. तर, प्रभूच्या चाहत्यांनी त्याच्या एव्हिक्शनवर नाराजी व्यक्त केली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा खेळ अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. खेळाचे ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.