Bigg Boss Marathi 6 Eviction Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून दर वीकेंडला कोणाचा प्रवास संपणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. अखेर भाऊच्या धक्क्यावर कोण एलिमिनेट झालंय, याची अपडेट नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडियावर दहाव्या आठवड्यात एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून दहाव्या आठवड्यात बेघर होण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. विशाल कोटियन, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, रेवा कौरासे, प्रभू शेळके, राकेश बापट आणि दिपाली सय्यद या सदस्यांचा यात समावेश होता. यापैकी सहा जण टास्कमध्ये नॉमिनेट झाले होते. पण, सातवी सदस्य दिपाली सय्यद घराचा कॅप्टन संकेत पाठकमुळे नॉमिनेट झाली होती.

संकेत या आठवड्यात घराता कॅप्टन असल्यामुळे त्याला विशेष पॉवर मिळाली होती. या पॉवरनुसार संकेतने दिपालीला थेट नॉमिनेट केलं होतं. पण, प्रत्यक्षात दिपालीला या नॉमिनेशनचा काहीच फटका बसलेला नाहीये. कारण, घराबाहेर गेलीये ‘वाइल्ड कार्ड’ म्हणून घरात एन्ट्री घेतलेली संस्कृती साळुंके.

Award Banner

संस्कृतीचे या आठवड्यात घरात अनेकांशी वाद झाले होते. अनुश्री आणि प्रभू दोघांशी ती भांडली होती. अनुश्रीने या वादादरम्यान तू यावेळी घरातून बाहेर जाणार असं ठामपणे तिला सांगितलं होतं. अखेर अनुश्रीचं हे बोलणं खरं झालं आहे. सोशल मीडियावर सर्वत्र संस्कृतीच्या एलिमिनेशनची चर्चा रंगली आहे.

आता भाऊच्या धक्क्यावर रितेशने जाहीर केल्यावर दहाव्या आठवड्यात नेमकं कोण घराबाहेर गेलंय याचा उलगडा होईल. जर खरंच संस्कृती एलिमिनेट झाली तर अवघ्या महिन्याभराच्या आत तिचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपलेला आहे.

याशिवाय भाऊच्या धक्क्यावर आज रितेश देशमुख राखी सावंत, संकेत पाठक या सदस्यांची शाळा घेणार आहे. आता जेवण फेकून दिल्यामुळे रितेश राखी सावंतला काय शिक्षा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, संस्कृती साळुंकेबद्दल सांगायचं झालं तर, रिअ‍ॅलिटी शोजमुळे संस्कृती घराघरांत पोहोचली होती. यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये ती सहभागी झाली होती. तिला ‘पापा की परी’ म्हणून देखील ओळखलं जातं.