Bigg Boss Marathi 6 Fame Sagar Karande : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या चांगलाच रंगत आहे. स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चांगलीच चुरस रंगली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात रोजच नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. आता हा शो अंतिम टप्प्याकडे जात आहे.

नुकतेच अभिनेत्री तन्वी कोलते हिला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाले आहे. त्यामुळे आता उरलेल्या स्पर्धकांपैकी अंतिम फेरीपर्यंत कोण जाणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यात ‘बिग बॉस’च्या घरातून गेल्या आठवड्यात अभिनेता सागर कारंडे बाहेर पडला. ‘यंदाच्या सीझनमधील चर्चेतल्या स्पर्धकांपैकी तो एक होता. उत्तम टास्क खेळत अन् आपल्या विनोदी शैलीने त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, दोन आठवडे बाकी असतानाच त्याचा या घरातील प्रवास संपला आहे. 

बिग बॉसच्या घरारून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने माध्यमांना मुलाखत दिली. त्यावेळी एका मुलाखतीत सागर कारंडेने सहस्पर्धक अनुश्री मानेची वागणूक, तसेच तिचे गेमप्लॅन यांबद्दल त्याने मत व्यक्त केले.

Award Banner

“अनुश्रीने मला दोनदा नॉमिनेट केलं; पण…” – सागर कारंडे

मराठी मनोरंजन विश्वला दिलेल्या मुलाखतीत सागर अनुश्रीबद्दल म्हणाला, “अनुश्री शोमध्ये मला खूप आवडली. तिने मला दोन वेळा नॉमिनेट केलं; पण तो गेमचा भाग आहे, ते ठीक आहे. नॉमिनेट केलं म्हणून तिच्याबद्दल वाईट बोलायचं किंवा ती व्यक्ती मला पटली नाही, असं होत नाही. गेमचा भाग म्हणून कुणाला ना कुणाला तरी नॉमिनेट करावंच लागतं.”

“अनुश्री आळशी आहे, खोटी वागली; पण…” – सागर कारंडे

त्यानंतर तो तिच्याबद्दल म्हणाला, “हो… इतरांना अनुश्री नाही पटत. लोकांनासुद्धा नाही पटत. पण मीसुद्धा लोकांना ती कळली नाही, असं म्हणणार नाही. ती जे वागत आहे, ते त्यांना पटत नाही. ठीक आहे. लोकांचं तिच्याबद्दल मत असेल. हो… अनुश्री आळशी आहे. खोटी वागली. पण, मी पुन्हा हेच सांगेन तोसुद्धा तिच्या गेमचा भाग आहे. ती आदर करत नाही, असं मी म्हणणार नाही. मी तिला खूप जवळून बघितलं आहे. ती आदर करते. आदर करत नाही, असं म्हणण्याऐवजी ती खूप फटकळ आहे; असं मी म्हणेन. तिचा स्वत:वर ताबा नाही. तिच्यातले चांगले गुण मला शोधता आले किंबहुना मी ते शोधले. त्यामुळे मला तरी ती आवडली.”

त्यानंतर सागर कारंडेला उरलेल्या स्पर्धकांपैकी टॉप-३ मध्ये कोण असेल, असं विचारलं गेलं. त्यावर सागरने, “अनुश्री माने, विशाल कोटियन व तन्वी कोलते… हे टॉप ३ मध्ये जातील”. तसेच त्याला विजयी कोण होईल, असंसुद्धा विचारलं गेलं. त्यावर सागरने “अनुश्रीच विजयी होईल, असं मला वाटतं”, असे उत्तर दिले.