Bigg Boss Marathi 6 Nomination : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य नुकतंच पार पडलं आहे. यावेळी घरातील सदस्यांना एक विशेष टास्क देण्यात आला होता. यामध्ये घरातील कोणता सदस्य कोणाची पतंग कापणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, त्याआधीच ‘बिग बॉस’ने एक मोठा ट्विस्ट आणला. हा ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात…

ग्रँड प्रीमियरला ज्या सदस्यांनी शॉर्टकट दार निवडलं होतं, त्यांना बिग बॉसकडून ‘पॉवर Key’ देण्यात आली होती. यामुळे घरातील एकूण सहा सदस्यांकडे पॉवर होती.

घरातील ज्या सदस्यांकडे पॉवर Key आहे, अशा सगळ्या सदस्यांना ‘बिग बॉस’ने पॉवर चेंबरमध्ये जोडीने बोलावलं. सोनाली-रुचिता, करण-प्राजक्ता, दिपाली-तन्वी अशा जोड्या बनवण्यात आल्या होत्या. पहिल्याच दिवशी रुचिताची पॉवर Key करणने घेतली होती…ही चावी करणने तिला पुन्हा परत देण्यास स्पष्ट नकार दिला.

या टास्कमध्ये करणने रुचिताला तिची पॉवर Key परत दिली नाही; त्यामुळे साहजिकच रुचिता घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट झाली. दिपाली व तन्वी यांच्यात पहिला बझर तन्वीने वाजवल्यामुळे ती कॅप्टन पदाची उमेदवार झाली तर, दिपाली नॉमिनेट झाली. रुचिता बाद झाल्यामुळे सोनालीला सुद्धा थेट कॅप्टन पदासाठी उमेदवार होता आलं. तर, प्राजक्ता आणि करण यांच्यात प्राजक्ता कॅप्टन पदाची दावेदार झाली तर, करण घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाला.

आता तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता या तिघींमध्ये कॅप्टन कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासाठी घरात वेगळा टास्क खेळवला जाईल. तर, अन्य सदस्यांमध्ये ‘पतंग टास्क’ खेळवण्यात आला.

तन्वी, सोनाली आणि प्राजक्ता यांना घरातील प्रत्येकी दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं. तन्वीने सागर आणि दिव्या यांना नॉमिनेट केलं, सोनालीने रोशन आणि राधा यांचं नाव घेतलं. तर, प्राजक्ताने प्रभू-अनुश्री या दोघांची पतंग कापली. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

‘हे’ नऊ सदस्य नॉमिनेट झाले

  • प्रभू
  • अनुश्री
  • दिव्या
  • सागर
  • राधा
  • रोशन
  • दिपाली
  • करण
  • रुचिता

दरम्यान, आता या नऊ जणांमध्ये सर्वाधिक मतं कोणाला मिळणार आणि सर्वात कमी मतं मिळवून घराबाहेर कोण होणार हे पहिल्या ‘वीकेंड का वार’ला स्पष्ट होईल.