Bigg Boss Marathi 6 : ग्रँड प्रीमियर सोहळ्यात शॉर्टकट निवडलेल्या स्पर्धकांना रितेश देशमुखने एक पॉवर Key दिली होती. या चावीची मदत स्पर्धकांना घरात एन्ट्री घेतल्यावर होणार होती. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाला आपली पॉवर Key जपून ठेवणं आवश्यक होतं. ही चावी कोणा दुसऱ्याच्या ताब्यात गेली की, आपल्यावर असणारी पॉवर सुद्धा गेली… हा बिग बॉसच्या घरचा नियमच आहे. या पॉवर Key ला हलक्यात घेणं रुचिताला चांगलंच महागात पडणार आहे. घरात तिसऱ्या दिवशी नेमका काय ड्रामा होणार पाहुयात…
‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या दिवशी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडण्याची दाट शक्यता आहे. यावेळी साहजिकच शॉर्टकट Key निवडणाऱ्या स्पर्धकांना काही पॉवर्स दिल्या जातील. पण, पॉवर चेंबरमध्ये जाण्यासाठी प्रत्येक शॉर्टकट निवडलेल्या स्पर्धकांकडे ग्रँड प्रीमियरला दिलेली पॉवर Key असणं गरजेचं होतं.
रुचिताची ही चावी गहाळ झाली असून ती करणच्या ताब्यात आहे. आपली पॉवर Key करणकडे आहे हे समजल्यावर रुचिताने त्याची समजून काढायला सुरुवात केली. करण, काही केल्या ऐकत नव्हता. रुचिता एका क्षणाला भावुक होऊन हे माझं स्वप्न होतं वगैरे असं बरंच काही करणला बोलत होती. इतकंच नव्हे तर बाल्कनीमध्ये जाऊन तिने करणसमोर हातही जोडले. पण, याचा काहीच परिणाम झाला नाही. बिग बॉसने शेअर केलेल्य प्रोमोमध्ये रुचिता शेवटी रडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता करणची मनधरणी करण्यात रुचिताला यश येणार की पॉवर Key ला हलक्यात घेणं महागात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
करण सोनावणे याने रुचिताची पॉवर Key नेमकी केव्हा घेतली?
तुम्हाला आठवत असेल…पहिल्याच दिवशी करण सोनावणे स्विमिंग पूलचं पाणी प्यायला होता. यावेळी तन्वीने त्याला हे पाणी आरोग्याच्या दृष्टीकोनातून पिऊ नकोस असा सल्ला दिला. फोकस इंडियनचा स्वभाव थोडा गमतीशीर असल्याने…तो बोलून गेला सगळे लोक फालतूचं टेन्शन घेत आहेत. हे वाक्य तन्वीला खटकलं आणि तिने वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात नंतर जवळच बसलेल्या रुचिताने एन्ट्री घेतली. करण राहिला बाजूला यानंतर तन्वी आणि रुचितामध्ये जोरदार भांडण झालं होतं. याचवेळी रुचिताने तिच्या जवळच्या पॉवर Key ला हलक्यात घेतलं आणि भांडण करायला प्राधान्य दिलं…शेवटी ही चावी करणच्या ताब्यात गेली.
करणने तेव्हा ‘बिग बॉस’ला रुचिताची चावी त्याच्या ताब्यात आलीये हे दाखवलं सुद्धा होतं. आता पॉवर चेंबर उघडल्यावर रुचिताला या चावीची आवश्यकता भासणार आहे. आता करण ही चावी देणार की नाही हे आजच्या भागात स्पष्ट होईल.
