Bigg Boss Marathi 6 Live Updates : बिग बॉस मराठी ६ मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री झाल्यापासून अनेकांचे वाद वाद झाले. राखीनेही बऱ्याच स्पर्धकांशी वाद घातले, त्यामुळे घरातलं वातावरण तापलं. आता आजच्या भागाचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात राखी सावंत प्राजक्ता शुकरेबद्दल असं काही की बोलली की प्राजक्ताचा राग अनावर झाला.

कलर्स मराठीने प्रोमो शेअर केला आहे. आज भाऊच्या धक्क्यावर आवडत्या सदस्यांना मिळणार गुलाब आणि नावडत्यांना काटे मिळणार. यावेळी राखी सावंत प्राजक्ताबद्दल म्हणते, “तुझ्यात खूप विष आहे.” यावर प्राजक्ता म्हणते, “हे काय पाठवलंय बिग बॉस. हे झेलावं लागतंय आम्हाला.” त्यावर मला जे करायचंय ते मी करत राहणार, असं राखी सावंतने म्हटलं. प्राजक्ताने तिला सडेतोड उत्तर दिलं. “तुझी पर्सनॅलिटी मी नीट ओळखते.” मग राखी प्राजक्ताला म्हणाली, “मला सर्टिफिकेट देऊ नकोस.”

राखी व प्राजक्ताचा शाब्दिक वाद आज भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इतर स्पर्धक कोणाला गुलाब देतात आणि कुणाला काटे देतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, या आठवड्यात डबल एव्हिक्शनची चर्चा आहे. बिग बॉसच्या घरातून कोणते दोन स्पर्धक बाहेर पडणार, तेही आज समजेल.

Live Updates
13:06 (IST) 15 Feb 2026

Video: 'या' दोन सदस्यांचा Bigg Boss Marathi तील प्रवास संपला! प्रोमो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले...

Bigg Boss Marathi Double Eviction Promo: चर्चा खऱ्या ठरल्या! बिग बॉसमधून 'हे' दोन स्पर्धक गेले घराबाहेर, प्रोमो व्हायरल ...वाचा सविस्तर