Bigg Boss Marathi 6 Day 38 Updates Nomination List : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एकूण नऊ सदस्य सहाव्या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार या नऊ जणांवर या आठवड्यात एलिमिनेशनची टांगती तलवार असणार आहे.

या सगळ्यात राखी सावंत ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा एकदा गोंधळ घालणार आहे. सध्या ‘बिग बॉस’ने घराची संपूर्ण जबाबदारी राखीच्या हातात सोपवली आहे. त्यामुळे संपूर्ण घराला ती स्वत:च्या तालावर नाचवतेय. राखी प्राजक्ताला झाडू मारून घर स्वच्छ करण्यास सांगते. पण, मी एकटी हे काम करणार नाही…असं म्हणत प्राजक्ता तिला स्पष्टपणे नकार देते.

प्राजक्ताने काम करण्यास नकार दिल्याने चिडलेली राखी किचनमधून पीठ आणते ते सोफ्यावर बसलेल्या प्राजक्ताच्या तोंडावर फेकते. या गोष्टीचा सचिन, सागर यांना प्रचंड राग येतो. सागर याबाबत राखीला जाब सुद्धा विचारतो. पण, राखी कोणाचंही ऐकून घेत नाही. “तुम्ही सगळे माझ्या पायाखाली आहात” असं राखी त्यांना ठणकावून सांगते.

भांडण टोकाला गेल्यावर सचिन कुमावत राखीच्या तोंडावर पाणी फेकून मारतो. यानंतर राखीचा संयम सुटतो…आपल्या तोंडावर पाणी कसं फेकलं? या विचारानेच तिचा संताप होतो आणि राखी रागात डायनिंग टेबलजवळची खुर्ची खाली पाडते.

राखीने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं आहे. गेल्या आठवड्यात भांडी फोडल्यामुळे राखीला कॅप्टन पदाच्या शर्यतीतून बाद केलं होतं. आता ‘बिग बॉस’ तिला काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 Updates

10:04 (IST) 18 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 - 'या' नऊ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार

10:01 (IST) 18 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 - नॉमिनेट झालेल्या सदस्यांची यादी

Bigg Boss Marathi 6 : घरातून बेघर होण्यासाठी हे नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

https://www.instagram.com/p/DU3g0K4DTiP/?img_index=1

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात सहाव्या आठवड्यात एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. तर, दुसरीकडे घराची जबाबदारी राखी सावंतकडे असल्यामुळे ती प्रत्येकाला चांगलीच धारेवर धरत असल्याचं पाहायला मिळत आहेत. राखीने प्राजक्तावर पीठ फेकल्यामुळे आज घरात मोठा ड्रामा पाहायला मिळेल.