Bigg Boss Marathi 6 Raqesh Bapat & Vishal Fight : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या १२ व्या आठवड्याचं नॉमिनेशन कार्य सुरू आहे. या टास्कमध्ये राकेशने विशालला नॉमिनेट केलं. सध्या खेळ अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की, प्रत्येक सदस्याला स्वत:ला सेफ करायचं आहे. त्यामुळे राकेशने नॉमिनेशनमध्ये विशालचं नाव घेतल्यावर तो प्रचंड भडकला. यानंतर विशालने राकेशच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्याने नॅशनल टेलिव्हिजनवर राकेशच्या घटस्फोटाचा मुद्दा बोलून दाखवला. यामुळे राकेश प्रचंड भडकला.
राकेशने याप्रकरणी विशालला जाब विचारला…यानंतर दोघांमधला वाद आणखी वाढला. “तू सुद्धा माझ्या वयावरून बोलला आहेस…तेव्हा ते पर्सनल नव्हतं का?” असा सवाल यावेळी विशालने राकेशला केला. पण, प्रत्यक्षात विशाल सुद्धा याआधी राकेश-रेवा यांच्या वयाबाबत बोलला आहे.
पुढे, विशाल राकेशच्या अंगावर धावून गेला यामुळे हे संपूर्ण प्रकरण आणखी चिघळलं. विशाल-राकेशच्या या वादाबाबत सध्या सर्व स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी आधी अंगावर धावून जाणाऱ्या विशालला घराबाहेर काढा अशी मागणीही केली आहे.
काय म्हणाली मेघा धाडे?
या सगळ्या प्रकरणात ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने प्रतिक्रिया दिली आहे. मेघा म्हणते, “विशाल तू तन्वी कोलतेच्या वयाबद्दल बोलला आहेस. राकेशला सुद्धा त्याच्या वयावरून बोलतोस…हे सगळं चालतं आणि मग तुला वयावरून बोलणं पर्सनल आहे का? कारण, तू तुझ्या वयाबद्दल खोटं बोलला आहेस. स्वत: २५ वर्षे लहान मुलीला पटवायला जातो तेही नॅशनल टेलिव्हिजनवर हे सगळं चालतं याला…ढोंगीपणा.”

दरम्यान, राकेश-विशालमध्ये जो काही वाद झाला. यानंतर ‘बिग बॉस’ने या दोघांनाही शिक्षा सुनावली आहे. राकेश या आठवड्यात थेट नॉमिनेट झालेला आहे, याशिवाय त्याने कॅप्टन्सी उमेदवारी सुद्धा गमावली आहे. तर, याउलट विशाल संपूर्ण सीझन नॉमिनेट झाला असून तो आता या सीझनमध्ये कॅप्टन सुद्धा होऊ शकणार नाहीये. अर्थात त्याने ‘तिकीट टू फिनाले’ची संधी देखील गमावली आहे.
