Bigg Boss Marathi 6 Updates Omkar Raut Evicted : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात एकूण नऊ जण नॉमिनेट होते. यापैकी दिव्या शिंदेला ‘बिग बॉस’च्या टीमने भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वीच निष्कासित केलं होतं. घरातील अन्य सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आणि त्यानंतर माफी न मागितल्यामुळे तिला घराबाहेर काढण्यात आलं.

यानंतर घरातील रोशन भजनकर, प्रभू शेळके, राकेश बापट, सचिन कुमावत, ओमकार राऊत, अनुश्री माने, आयुष संजीव, दिपाली सय्यद असे एकूण आठ सदस्य नॉमिनेट होते.

रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर शेवटी आयुष संजीव आणि ओमकार राऊत हे दोन स्पर्धक व्होटिंगनुसार बॉटमला असल्याचं सांगितलं. तर, बाकीचे सगळे सेफ होते. यानंतर ओमकार राऊत या आठवड्यात सर्वात कमी मतं मिळाल्याने एलिमिनेट झाला आहे असं रितेशने जाहीर केलं.

ओमकार राऊत काय म्हणाला?

घरातून एक्झिट घेतल्यावर ओमकार राऊत रितेशला मंचावर येऊन भेटला. तो म्हणाला, “भाऊ प्रवास खूप छोटा होता…पण, मला सर्वांबरोबर या घरात राहून खूप छान वाटलं. याठिकाणी मला वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या लोकांना भेटता आलं. ही व्हिडीओ क्लिप पाहून खूप छान वाटलं…सगळ्या आठवणी आणि माझा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला” ( घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाला त्याचा प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला जातो )

आता ओमकारच्या एक्झिटनंतर पुढील आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोण सुरक्षित राहणार, कोण असुरक्षित होणार? पुढच्या नॉमिनेशनमध्ये कोणाची नावं पुढे येणार आणि कोणाचा प्रवास थांबणार? घरात नवी समीकरणं तयार होणार की जुन्याच वादांना उधाण येणार? आणि सर्वात महत्त्वाचं पुढचा ‘राडा’ नेमका कोण घालणार? या सगळ्याची उत्तरं लवकरच ‘BIGG BOSS मराठी’च्या आगामी एपिसोड्समध्ये मिळणार आहेत.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात राखी सावंत वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा आहेत. आता खरंच घरात राखी येतेय की, दुसरं कोणी हे आपल्याला सोमवारच्या भागात पाहायला मिळेल.