Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस’ हा खेळ असा आहे, जो कधीही बदलू शकतो. स्पर्धकांमधील मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वामध्ये होऊ शकते; तर शत्रू मित्र होऊ शकतात. त्यामुळे सदस्यांमधील समीकरणे बदलू शकतात. अशा सगळ्या गोष्टींमुळेच बिग बॉसच्या खेळात ट्विस्ट येत असल्याचे पाहायला मिळते.
आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातदेखील असाच काहीसा ट्विस्ट आला आहे. दर दिवसाला घरातील समीकरणे बदलताना दिसत आहेत. सध्या घरात तीन गट पाहायला मिळत आहेत. त्यातील ‘काटा गँग’मध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दीपाली सय्यद, प्रभू शेळके हे सदस्य आहेत. प्रभू आणि तन्वी यांच्यातील बॉण्डिंग सुरुवातीपासूनच लक्ष वेधून घेते. ते एकमेकांना भाऊ-बहीण म्हणत असल्याचे पाहायला मिळते.
आता मात्र त्यांच्यात फूट पडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस मराठीचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, किचनमध्ये तन्वी, प्रभू, राखी आणि इतर सदस्य आहेत. राखी प्रभूला म्हणते की, तू इथे पदर पकडायला आला नाहीस. तू इथे एक स्पर्धक आहेस. त्यावर तन्वी, ही काहीही बोलतेय, असे म्हणते. राखी पुन्हा प्रभूला म्हणते, स्वत:साठी खेळ. त्यानंतर प्रभू म्हणतो की, एकही निर्णय घेतला जात नव्हता. मी एकटा काय करू? प्रभूच्या बोलण्यानंतर तन्वीला राग आल्याचे पाहायला मिळत आहे.
“उद्यापासून माझा पदर पकडू नकोस”
तन्वी म्हणते, “तुला वाटत असेल की, तू पदर पकडून असतोस. तर, उद्यापासून माझा पदर पकडू नकोस. त्यानंतर प्रभू रडत असल्याचे पाहायला मिळते. राखी प्रभूला म्हणते, “तू तिला कॅप्टन बनवलं आहेस. तुझा वापर करतात.” पुढे ती रडत प्रभूला म्हणते, “सॉरी, मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही.”
हा प्रोमो शेअर करताना कलर्स वाहिनीने, ‘डॉन सोडणार का तन्वीची साथ?’, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी म्हणाले…
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक कमेंट्स केल्या गेल्या आहेत.”राखी प्रत्येकाचे डोळे उघडत आहे”, “राखी काट्यात राहून काट्यांचा काटा काढते”, “राखी टोळीला नडत होती, तर काटा टीमला वाटत होते की, ती त्यांच्या बाजूनं आहे; पण राखी कोणाचीच नसते. तन्वी किती झुकायची राखीसमोर, ती काहीही बोललं तरीही घाबरायची”, “तन्वीनं प्यादा म्हणून त्याचा वापर केला”, “ते सगळे ठीक आहे; पण राखी केव्हापासून रडू लागली”, “कडक. राखी खूप छान खेळत आहे”, “राखी , खूप छान”, अशा अनेक कमेंट्स केल्या गेल्या आहेत.





दरम्यान, तन्वी नुकतीच घराची कॅप्टन झाली आहे. आता घरातील समीकरणे कशी बदलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
