Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या चांगलाच रंगात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या शोची चर्चा सुरू आहे. राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून शोमध्ये दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. प्रेक्षकांप्रमाणे सेलिब्रिटी सुद्धा हा शो फॉलो करत असतात. दररोजच्या एपिसोडमधल्या खटकणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टींवर हे सेलिब्रिटी पोस्ट शेअर करत आपली मतं मांडताना दिसतात.

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोगने या सीझनबद्दल नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने यंदा शोचे टॉप-५ स्पर्धक कोण होऊ शकतात याबद्दल भाकीत केलं आहे.

पुष्कर जोगने अभिनेत्री तन्वी कोलते हा शो जिंकेल असं भाकीत केलं आहे. याशिवाय यंदा-२ स्पर्धक कोण असतील याचाही अंदाज पुष्करने व्यक्त केला आहे.

पुष्करच्या मते हे असतील टॉप-५ सदस्य

पुष्कर जोग म्हणाला, “माझे मते बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचे टॉप-५ सदस्य असतील तन्वी कोलते, राकेश बापट, रोशन भजनकर, सागर कारंडे आणि दिपाली सय्यद. यातून तन्वी आणि राकेश टॉप-२ होतील आणि तन्वी या शोची विजेती असेल.”

पुष्करने टॉप-५ स्पर्धकांची जी नावं घेतली आहेत त्यात टोळीचा फक्त एकच सदस्य आहे तो म्हणजे रोशन भजनकर. अनुश्री माने, रुचिता जामदार, विशाल कोटियन यांना पुष्करने आपल्या टॉप-५ लिस्टमध्ये जागा दिलेली नाहीये. आता अभिनेत्याचं हे भाकीत खरं ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

pushkar jog
पुष्कर जोगची पोस्ट ( Pushkar Jog Predicts Winner )

दरम्यान, तन्वी कोलतेबद्दल सांगायचं झालं तर, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता ‘बिग बॉस’च्या शोमुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पहिल्या आठवड्यात अनेकांनी तन्वीच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते. पण, आता हळुहळू तन्वी सर्वांची मनं जिंकून घेताना दिसत आहे.