Bigg Boss Marathi 6 Nomination Task: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात दररोज नवीन ट्विस्ट येत आहेत. रोशन भजनकर नुकताच बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला. त्यानंतर बिग बॉसच्या घरात तीन नवीन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली.
‘दीवानियात’ आणि ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती’ या मालिकांमध्ये दिसलेली रेवा कौरसे ही वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली. याबरोबरच लग्नाची बेडी या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेला संकेत पाठकदेखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. तसेच, जाऊ बाई गावात या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली संस्कृती सांळुखेदेखील या शोमध्ये सहभागी झाली आहे.
आता तीन स्पर्धकांची एकाच वेळी एन्ट्री झाल्याने खेळात नेमके काय बदल होणार, नेमके काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे स्पर्धक घरात आधीपासून असलेल्या स्पर्धकांबरोबर मैत्री करणार की त्यांचा वेगळा गट बनवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.
आता नवीन आठवड्यातील नॉमिनेशन टास्कने लक्ष वेधले आहेत. दर आठवड्याला होणाऱ्या नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसतात. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी कोणत्या स्पर्धकांना नॉमिनेट करत आहे, हे पाहायला मिळत असून राखी त्यांना स्पष्ट शब्दांत त्यांच्या खेळाबद्दल सुनावत असल्याचे दिसते.
राखीने ‘या’ स्पर्धकांना केले नॉमिनेट
कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की राखी तन्वीला म्हणते,”मी तुला नॉमिनेट करत आहे. गेल्या आठवड्यात एकदम इमोशनल कार्ड खेळत होतीस. का?” त्यानंतर तन्वी भावुक होते. ती रडताना दिसते.
तन्वीनंतर राखी दीपालीला नॉमिनेट करते. ती तिला म्हणते, “हे अनाथआश्रम नाही. आपण गुडबुक्समध्ये का राहता? हे बिग बॉसचं घर आहे, इथे स्वत:चं कॅरेक्टर लपवू नका.” शेवटी टास्कनुसार तन्वी आणि दीपालीने हेल्मेट घातले असून राखी त्यावर बाटल्या फोडताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “राखी खडे बोल बोलणार, सदस्यांच्या डोक्यावर बाटल्या फुटणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी म्हणाले…
या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. कमेंट्स करत नेटकऱ्यांनी राखीचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “राखी एक नंबर खेळत आहे. राखी रॉकस्टार आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “राखी, बरोबर आहे”, एकाने लिहिले, “खूप छान राखी”, एकाने लिहिले, “तन्वी खूप छान आहे. सगळे तिच्यावर जळतात”, दुसऱ्या एकाने लिहिले, “पहिल्यापासून तन्वी छान खेळते. एकटीच खेळते. मागून येणारे जास्त उड्या मारतात”, एकाने लिहिले, “कोण किती बोललं तरी काटा टीमच पुढे राहिल”, एकाने लिहिले, “राखीच खरा गेम खेळते”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.




दरम्यान, आता या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
