Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant Heartbreak : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतने एन्ट्री घेतल्यापासून प्रत्येक दिवशी एक वेगळा ड्रामा पाहायला मिळतोय. राखी अन् राकेशच्या मैत्रीवरून रितेश देशमुखने सुद्धा भाऊच्या धक्क्यावर या दोघांची मजा घेतली होती. कारण, राकेश आणि तन्वीचा डान्स पाहून राखी प्रचंड दुखावली होती आणि तिने चक्क स्वत:चे केस कापून घेतले आहेत.
यानंतर रुचिताची विशालवरून समजूत काढताना स्वत: ‘बिग बॉस’ने सुद्धा तिला राखी-राकेशच्या नात्याचं उदाहरण दिलं होतं. या दोघांची निव्वळ मैत्री आहे पण, सध्या सगळेजण त्यांना मजा म्हणून चिडवत आहेत असं ‘बिग बॉस’ने सांगितलं होतं. मात्र, राखीच्या बाजूने ही केवळ मैत्री नाहीये. आजच्या भागात याचा रिअॅलिटी चेक प्रत्येकाला मिळणार आहे.
हर्ट झालेल्या राखीचं सांत्वन करण्यासाठी राकेश तिच्याजवळ येतो. यावेळी “आपण फक्त मित्र आहोत” या वाक्यावर राकेश जोर देतो. यानंतर राखी त्याला पुन्हा विचारते, “म्हणजे आता आपण फक्त मित्र आहोत का?” पण राकेश, “मला दुसऱ्यांना हर्ट करायचं नाहीये” असं म्हणत तिथून निघून जातो.
‘I Am Loser’ म्हणत स्विमिंग पूलमध्ये उडी मारली…
पण, या सगळ्यामुळे राखी प्रचंड दुखावते. या दोघांच्या गोड नात्याला ग्रहण लागलं असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ने हा प्रोमो शेअर केला आहे.
यानंतर हा सगळा ड्रामा इतक्यावरच थांबत नाही. यानंतर राखी ‘I Am Loser’ म्हणत रडत-रडत स्विमिंग पूलकडे येते आणि पाण्यात उडी मारते. तिची ही भयंकर कृती पाहून सगळेजण हैराण होतात आणि तिला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्विमिंग पूलच्या दिशेने धाव घेतात.
या प्रोमोची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “कुठलं नातं…सगळं फेक आहे”, “भांडण-तंटा राहिला बाजूला हा शो बिग बॉस कमी आणि लव्ह बॉस जास्त झालाय”, “बिग बॉस कमी आणि लव्ह स्टोरी सुरूये सगळी”, “हे ग्रहण राखीला खूप आधीच लागलंय”, “हे काय सुरूये बिग बॉसमध्ये?”, “राखी खूप नाटकं करतेय राकेशच्या बाजूने कधीच-काहीच नव्हतं” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, आता या सगळ्या ड्रामामुळे राखी-राकेशच्या नात्यावर काय परिणाम होणार? या दोघांची मैत्री अशीच राहील की यांच्यात दुरावा येईल? हे लवकरच स्पष्ट होईल.
