Bigg Boss Marathi 6 Promo Day 65 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या दहाव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे. या टास्कमध्ये कॅप्टन संकेतला ‘बिग बॉस’कडून एक विशेष पॉवर मिळणार आहे. याअंतर्गत त्याला घरातील एका सदस्याला नॉमिनेट करता येणार आहे. आता संकेत कोणाला नॉमिनेट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय घरात आणखी एक राडा होणार आहे.
राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यात किचन एरियामध्ये जोरदार भांडण होणार आहे. घरात एन्ट्री घेतल्यापासून दुपारच्या जेवणाची ड्युटी राखी सावंत सांभाळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राखी जेवण बनवत असताना ओरडून सांगते, “आता मी जेवण बनवतेय…त्यामुळे चहा बनवायचा नाही.” इतक्यात सागर तिथे पोहोचतो आणि रागात म्हणतो, “उगाच ओरडू नको.”
सागर आणि राखी या दोघांमध्ये याच जेवणाच्या मुद्द्यावरून मोठं भांडणं होणार आहे. शेवटी राखी रागात जेवणाचा टोप उचलते आणि म्हणते, “मी सगळं जेवणच टाकून देते…” इतक्यात घरातील अन्य सदस्य राखीच्या मागे धावतात आणि तिला असं करू नकोस सांगतात. यानंतर घरात एकच आरडाओरडा सुरू होतो.
राखी जोरजोरात ओरडून म्हणते, “तू मला शक्ती दाखवायला आला आहेस? मुडX चल हट…” सागरवर ती हात उगारण्याचा प्रयत्न करते यावेळी अभिनेता तिला सांगतो, “मला हात लावायचा नाही!”
राखी आणि सागर दोघंही एकमेकांवर किंचाळू लागतात, एकमेकांच्या अंगावर धावून जातात. राखी तर इतकी रागात असते की, तिला कंट्रोल करण्यासाठी राकेश आणि विशाल मागून तिला पकडून ठेवतात. यादरम्यान सुद्धा राखी जोरजोरात किंचाळत असते.
राखी आणि सागरमुळे आज ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा पाहायला मिळणार आहे. आता या दोघांचा वाद मिटणार की वाढणार हे आजच्या भागात स्पष्ट होईल.
नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “राखी ऐकणार नाही…राडा होणार”, “राखी कशीये सगळ्यांना माहिती होती पण आता सागरचं खरं रुप समोर येऊ लागलंय”, “राखीचं आता अति होतंय आणि त्यात हा सागर”, “राखी आहे म्हणून बिगबॉस आहे”, “सागर नॉमिनेट झालाय वाटतं”, “सागर ओरडू नकोस उगाच”, “सागरला बाहेर काढा” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
दरम्यान, आता दहाव्या आठवड्यात मल्टीपल एव्हिक्शन होईल असं आधीच जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच एकापेक्षा अधिक सदस्य घराबाहेर जाऊ शकतात. त्यामुळे घरातून कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
