Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात सर्वात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कॅप्टन्सी उमेदवारीसाठी घरात ‘बीबी पापड फॅक्टरी’ टास्क पार पडला. यादरम्यान राकेश बापट आणि रुचिता यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला करण-रुचितामध्ये वाद झाले पण, टास्क संपल्यावर रुचिताने त्याची माफी मागितली आणि प्रकरण मिटलं.
अशाप्रकारे वुमन कार्ड खेळणं चुकीचं आहे असं करण ओरडून-ओरडून रुचिताला सांगत होता तेव्हा कुठे तिला आपली चूक झाली असेल असं वाटलं. पण, दुसरीकडे राकेशला रुचिता-विशालशी बोलण्यात काहीही रस राहिलेला नाहीये. रुचिता टास्कदरम्यान माझ्या अंगावर धावून आली आणि यादरम्यान तिने मला चुकीचा स्पर्श केला असा आरोप राकेश बापटने रुचितावर केला आहे. रुचिताने नेमकं काय केलंय याबद्दलचे संवाद प्रायव्हसी लक्षात घेऊन एपिसोडदरम्यान बीप करण्यात आले आहेत.
टास्क खेळताना रुचिताने जे काही अग्रेशन दाखवलं त्यानंतर राकेशने या गोष्टीवर संताप व्यक्त केला आणि तो रागात बेडरूममध्ये निघून गेला. दिपालीला सुद्धा त्याने ही गोष्ट सांगितली. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी रुचिताने दिपालीवर वेगळेच आरोप करण्यास सुरुवात केली. तू माझ्याविषयी राकेशला टच केलास हे चुकीचं भाष्य केलंस असं बोलून रुचिता दिपालीशी वाद घालू लागली. पण, खरंतर या सगळ्या प्रकरणात दिपालीची काहीच चूक नव्हती. दिपाली फक्त RB जे काही बोललाय ते फक्त रुचिताला सांगत होती.
रुचिताने यावरून घरात मोठमोठ्याने वाद घालायला सुरुवात केली. दिपालीने या सगळ्या गोष्टी राकेशसमोर येऊन क्लिअर कर असंही तिला सुचवलं पण, ती काही केल्या ऐकत नव्हती. शेवटी, विशालने मध्यस्थी केली आणि सगळेजण राकेशजवळ गेले.
राकेश म्हणाला, “मी तिला टास्कदरम्यान सांगत होतो माझ्याजवळ येऊ नकोस ती अग्रेशनमध्ये ऐकत नव्हती. मला आता या गोष्टीवर अजिबात बोलायचं नाही. मी जे काही बोलेन ते थेट भाऊच्या धक्क्यावर बोलेन. तिथे याबद्दल चर्चा होईल…मी आता याबद्दल काहीच बोलणार नाही.” विशाल आणि रुचिता तिथून निघून गेल्यावर राकेश कॅमेऱ्याजवळ बघून म्हणाला, “मला विशाल आणि त्या रुचिताचं थोबाड बघायचं नाहीये. ही गोष्ट अगदी क्लिअर आहे. तो यामध्ये पडतोय हे मला अजिबात पटत नाहीये. हे दोघंही Idiots आहेत.”
वॉशरूम एरिआमध्ये प्राजक्ता आणि अन्य सदस्यांशी संवाद साधताना राकेश म्हणाला, “मी खरंच हे सगळं भाऊच्या धक्क्यावर बोलणार आहे. मला माझी वाक्य नीट आठवत आहेत. मला धक्का लागला, ती माझ्या अंगावर येत होती… काय बोलायचं आहे ते मी ठरवेन यावर आता चर्चा नको.”
दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल रितेश देशमुख काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अनेकजण रुचिताला घराबाहेर काढा अशीही मागणी करत आहेत.

