Bigg Boss Marathi 6: बिग बॉसचे सहावे पर्व आता अंतिम टप्प्यात आहे. नुकतीच राखी सावंत शोमधून एलिटमिनेट झाली आहे. आता घरात सहा स्पर्धक उरले आहेत. यामध्ये राकेश बापट, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, रेवा कौरसे, विशाल कोटियन, अनुश्री माने या स्पर्धकांचा समावेश आहे. तसेच तिकीट टू फिनाले तन्वी कोलतेने जिंकले आहे.
बिग बॉसच्या घरात सतत काही ना काही घडताना दिसते. मजा मस्ती, विनोद याबरोबरच मतभेद, वाद-विवादही पाहायला मिळतात. सहाव्या पर्वात टोळी, काटा गँग हे दोन ग्रुप प्रामुख्याने पाहायला मिळाले.
टोळीमध्ये फूट पडली. त्यातील सदस्य बाहेर पडले. आता विशाल आणि अनुश्री दोघे उरले आहेत. पण, काटा गँगमधील सदस्यांच्या मैत्रीची चर्चा झाली. या ग्रुपमध्ये राकेश बापट, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, रेवा कौरसे हे स्पर्धक आहेत. तसेच प्रभू शेळकेदेखील याच ग्रुपमध्ये होता. मात्र, काहीच दिवसांपूर्वी प्रभू एलिमिनेट झाला. आता मात्र काटा गँगमध्ये फूट पडत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
“चौकात त्याचा बाजार…”
कलर्स मराठी वाहिनीने ‘बिग बॉस मराठी’चा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, रितेश देशमुख राकेश बापटला म्हणतो की, राकेश तुमच्यसमोर विंचू आहे. असा कोणता सदस्य आहे. जो डंख मारतो, ज्यांचे शब्द टोचतात. त्यावर राकेश म्हणतो, दिपाली आणि तन्वी दोघींनाही हे द्यायचं आहे. त्यानंतर राकेशजवळ तन्वी आणि दिपाली येतात. राकेश त्यांना म्हणतो, “स्पष्टपणे बोला. टोचून बोलू नका.” त्यावर तन्वी म्हणते, “आपल्या घरातील भांडणे ही घरातच सोडवावीत. चौकात त्याचा बाजार मांडू नये.”
हा प्रोमो शेअर करताना राकेशच बोलणं तन्वी व दिपालीच्या जिव्हारी लागणार का? अशी कॅप्शन दिली आहे. आता हा प्रोमो पहिल्यानंतर अनेकांनी राकेशला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तन्वी व दिपालीची बाजू घेतली आहे.
एकाने लिहिले, “एकाने लिहिले, “तन्वी व दिपाली दोघी खोट्या आहेत”, दुसऱ्या एकाने लिहिले, “राकेश बापट या पर्वाचा विजेता होणार”, आणखी एकाने लिहिले, “तन्वी तू मोठ्याने ओरडून बोलतेस तेव्हा सुद्धा चौकात बाजार मांडल्यासारखं वाटतं. जेव्हा तू दुसर्याच्या चहाड्या करतेस, तेव्हासुद्धा चौकात बसून चहाड्या केल्यासारखं वाटतं”, एकाने लिहिले, “बिग बॉस हे घर नॅशनल टेलिव्हिजनवर आहे, चौकात नाही. तन्वी कोलते तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे.” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.


दरम्यान, आता पर्वाच्या शेवटी तन्वी, दिपाली व राकेश यांच्या मैत्रीत फूट पडणार की त्यांच्यातील गैरसमज दूर होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
