Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आयुष व तन्वी लव्ह अँगल आणण्याचा प्रयत्न करत आहेत असं स्टेटमेंट रुचिताने काही दिवसांपूर्वी केलं होतं. पण, प्रत्यक्षात हे दोघंही खूप चांगले मित्र होते. खरंतर, आयुष शेवटी घरातून जाता-जाता तन्वीशी नीट बोलतही नव्हता. यामुळे ती प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. घराबाहेर आल्यावर सुद्धा आयुषने प्राजक्ता, करण, सचिन आणि ओमकार हे चार मित्र आयुष्यभरासाठी कमावले असं म्हटलं होतं. यावेळी सुद्धा त्याने तन्वीबरोबर मैत्री असल्याचं म्हटलं नव्हतं.

पण, आता आयुष-तन्वीच्या मैत्रीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामागचं कारण होतं राखी सावंत. राखीने या आठवड्यात आयुष तन्वीचा बॉयफ्रेंड होता असं वक्तव्य केलं होतं. यामुळे तन्वी प्रचंड भडकली. यानंतर दिवसभर तन्वी आणि राखीमध्ये वाद सुरू होता. या एका वक्तव्यावरून इतका मोठा वाद करण्याची गरज नव्हती असा सल्ला देत रितेश देशमुखने तन्वीला आरसा दाखवला आहे.

रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर म्हणाला, “तन्वी कोलते जी मुद्दा एवढा खेचते की सर्वांना Bored करते. तुम्ही नेहमी समोरच्याला ‘प्रतिसाद’ देत नाही तर ‘प्रतिक्रिया’ देत राहतात. राखी यांनी स्टेटमेंट केलं होतं की, आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे…यावरून तुम्ही लगेच ट्रिगर झालात आणि नंतर आरडाओरडा, आवाज…प्रेक्षकांच्या कानाला प्रचंड त्रास झाला.”

रितेश भाऊंनी या सगळ्या चुका दाखवताच तन्वीचे डोळे पाणावले. तिला अश्रू अनावर झाले होते…हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

“भाऊ एकदम बरोबर बोलले तन्वीला याची गरज होती”, “तन्वीला हा सल्ला देण्याची खूप गरज होती… योग्य केलं”, “मस्त बोललात भाऊ”, “तन्वी Dominating वागलीये बरं झालं बोललात”, “तन्वी खरंच खूप जोरात ओरडते बरं झालं गरजेचं होतं”, “अजून झापा तिला” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.

दरम्यान, आता या आठवड्यात राखी सावंत, रोशन भजनकर, राकेश बापट आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यामध्ये घराबाहेर कोण जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.