Bigg Boss Marathi 6: बिग बॉस हा असा रिअॅलिटी शो आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे, नावाजलेल्या व्यक्ती सहभागी होतात. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना लोक ओळखत असतात.
अशा व्यक्ती जेव्हा बिग बॉससारख्या शोमध्ये येतात, तेव्हा ते रोजच्या आयुष्यात कसे वागतात, एखाद्या गोष्टीवर त्यांची प्रतिक्रिया काय असते. जेव्हा त्यांच्यावर किंवा इतरांवर अन्याय होतो, तेव्हा ते काय करतात, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यांच्या वागण्यावरून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून अनेकजण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात. तर काहीजणांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
या सगळ्याबरोबरच स्पर्धकांना काही टास्क दिले जातात, त्यावेळी अनेक गमतीजमती घडताना दिसतात. स्पर्धकांसह प्रेक्षकही खळखळून हसतात.
सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू आहे. रितेश देशमुख या शोचे सूत्रसंचालन करत आहे. आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर ते चुकीचे वागणाऱ्या स्पर्धकांना जाब विचारतात. तसेच बरोबर असलेल्या स्पर्धकांचे कौतुकही करतात. शनिवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये अनुश्री, विशाल तसेच रुचिता यांना त्यांच्या वागण्यावरून रितेश देशमुखने चांगलेच सुनावले.
प्रभू शेळके वेधणार लक्ष
आता कलर्स मराठी वाहिनीने बिग बॉस मराठीचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रभू शेळकेने या प्रोमोमध्ये लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.
कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रा अकाउंटवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की रितेश देशमुख घरातील स्पर्धकांना चान्स पे डान्स हा टास्क देतो. त्यानंतर स्पर्धक विविध गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत. सुरुवातीला देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार हे गाणे वाजत असल्याचे दिसत आहे. तसेच तिथे काही वस्तू ठेवलेल्या दिसत आहे. स्पर्धकांबरोबर रितेश देशमुखही काही डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत.
पुढे पाहायला मिळते की चंद्रा हे गाणे सुरू होते. त्यावरही स्पर्धक थिरकताना दिसत आहेत. प्रभू शेळकेच्या डान्स स्टेप्स लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळते. शेवटी रितेश देशमुख प्रभूसारखी डान्स स्टेप करत त्याला विचारतो की प्रभु हा चंद्रा कुठला आहे, मला कळला नाही. त्यावर प्रभुसह सर्वजण हसताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “जेव्हा मिळणार चान्स तेव्हा भाऊच्या धक्क्यावर होणार डान्स”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, आता या आठवड्यात कोणत्या स्पर्धकाला बाहेर जावं लागणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
