Bigg Boss Marathi 6 Eviction Saturday Eviction Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये या आठवड्यात फक्त चार सदस्य नॉमिनेट झाले होते. तन्वी घराची कॅप्टन असल्याने ती नॉमिनेशन प्रक्रियेत सुरक्षित होती. तर, प्रभू आणि अनुश्री या दोघांकडे ‘पॉवर Key’ असल्याने ते दोघंही या टास्कमध्ये Safe होते. यानंतर उर्वरित सदस्यांमध्ये ‘नॉमिनेशनचा लगाम’ हा टास्क खेळवण्यात आला.

रोशन भजनकर, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे आणि राखी सावंत हे चार सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. हे चारही स्पर्धक पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेत. रोशनला सुद्धा महाराष्ट्रातून चांगला सपोर्ट मिळत होता. त्यामुळे आता या चार जणांपैकी घराबाहेर कोण जाणार? सातव्या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. अखेर एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.

सातव्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव आहे रोशन भजनकर. खरंतर रोशनचं एव्हिक्शन प्रत्येकासाठी शॉकिंग होतं. रोशनला बाहेरून प्रचंड सपोर्ट होता त्यामुळे तो घराबाहेर कसा केला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. पण, दुसरीकडे जे प्रेक्षक खरंच गेम म्हणून या शोकडे पाहतात. त्या सगळ्यांना हे एव्हिक्शन अगदी Fair वाटलं आहे.

रोशन पहिल्या दिवसापासून घरात काहीच गेम खेळत नव्हता. त्याचा सगळा गेम टोळीमधील अन्य सदस्यांच्या निर्णयानुसार चालायचा. रुचिता, विशाल जे काही सांगायचे ते रोशन ऐकायचा आणि तसाच वागायचा. एकंदर रोशनला घरात स्वत:चा स्टँड नाहीये असं काटा ग्रुपचं देखील ठामपणे म्हणणं होतं. स्वत:चा कोणताही गेम नसणं हेच रोशनला महागात पडलं आहे.

रोशनचा घरातील प्रवास संपल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. मात्र, अद्याप ‘कलर्स मराठी’ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. शनिवारी भाऊचा धक्का संपताना रितेश घरातून कोण बाहेर होणार हे अधिकृतरित्या जाहीर करेल. पण, त्याआधीच रोशन एलिमिनेट झाल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे. यावर्षीच्या सीझनमध्ये पहिल्यांदाच शनिवारी एलिमिनेशन होणार आहे.

bigg boss marathi roshan eviction
रोशनच्या एव्हिक्शनची सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये लवकरच काही सदस्य वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे. याबाबतची अपडेट लवकरच बिग बॉस मराठीच्या टीमकडून शेअर केली जाईल.