Bigg Boss Marathi 6 Ruchita & Vishal Promo : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन आता जवळपास एक महिना उलटला आहे. या शोची सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात पहिला लव्ह अँगल सुरू झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहे. या चर्चा सुरू व्हायचं कारण म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ने नुकताच शेअर केलेला प्रोमो. या प्रोमोमध्ये रुचिताला विशालसाठी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नेहमीप्रमाणे यंदाच्या सीझनमध्ये देखील ‘बिग बॉस’च्या घरात दोन ग्रुप्स पडले आहेत. मात्र, ‘टोळी’मध्ये असलेले सदस्य पहिल्यापासून एकमेकांशी लॉयल असल्याचं पाहायला मिळत आहे. रुचिताने आतापर्यंत शोमध्ये जवळपास प्रत्येकाशी वाद घातला आहे. पण, या सगळ्यादरम्यान विशालने तिची खंबीरपणे बाजू घेतली आहे. विशाल आणि रुचितामध्ये राखी सावंतमुळे खटके उडाल्याचं नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळालं. आता यानंतर रुचिताला अश्रू अनावर झाले आहेत.

रुचिता विशालबद्दलच्या भावना अनुश्रीसमोर व्यक्त करणार आहे. अनुश्री रुचिताला विचारते, “तुला काय फिलिंग्स आहेत विशालबद्दल?” यावर रुचिता म्हणते, “मला त्याचा प्रेझेन्स आवडतो…पूर्ण घरातले लोक जेव्हा माझ्या चुकांबद्दल बोलत असतात तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्ह गोष्टींवर बोलतो. मी त्याच्याशी खूप अटॅच्ड आहे…खूप म्हणजे खूप! मला कळतच नाहीये मी काय करू?”

यावेळी अनुश्रीबरोबर संवाद साधताना रुचिता खूप रडत असते. “आपल्या मनातली भावना रुचिता विशालला सांगेल का?” असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, बिग बॉसने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. ही रुचिता २१ वर्षांची आहे आणि विशाल ४० वर्षांचा…काय सुरूये हे, बिग बॉस मराठी ६ ची पहिली लव्हस्टोरी, कॅमेऱ्यासाठी नाटक करणं सुरूये, हे लोक आधी दुसऱ्यांना लव्ह अँगल बोलत होते…स्वत: काय केलं मग, विशालचं वय काय हिचं काय, दोघंही निगेटिव्ह आहेत विशाल आणि ही म्हणून वाटत असेल अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आल्या आहेत.

bb marathi
Bigg Boss Marathi 6 – नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, आता रुचिता खरंच या गोष्टी विशालसमोर व्यक्त करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.