Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar Reaction After Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आठव्या आठवड्यात रुचिता जामदारची एक्झिट झाली आहे. रुचिताचं एलिमिनेशन सर्वांसाठीच खूप शॉकिंग होतं. तिचा प्रवास इतक्या लवकर संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. रुचिताच्या एलिमिनेशननंतर तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. तर काही ‘बिग बॉस’प्रेमींनी हे एलिमिनेशन अगदी योग्य होतं असं देखील म्हटलं आहे.

रुचिता जामदारने घराबाहेर आल्यावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्यासाठीही हे एलिमिनेशन आश्चर्यकारक होतं असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रुचिता जामदार म्हणाली, “बिग बॉसच्या या घरात मी प्रत्येक गोष्ट मनापासून केली आणि खूपवेळा नॉमिनेट सुद्धा झाले होते. तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला कायम या खेळात साथ दिली, बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते. आजचं एव्हिक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे…पण, जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार!”

रुचिता जामदार एव्हिक्शननंतर सर्वप्रथम शोमधील एका खास व्यक्तीला भेटली. त्या व्यक्तीचं नाव आहे राधा पाटील. रुचिताने तिच्याबरोबर खास व्हिडीओ शेअर केला आहे. राधा या व्हिडीओमध्ये म्हणते, “मी रुचिताला टॉप-५ मध्ये बघत होते…वाईट वाटतंय. पण, लवकर आली बरं झालं मला स्कीनची ट्रिटमेंट करायची होती आणि रुचिता मला पत्ता सांगणार होती. तर बरं झालं ही आली.”

या दोघींचं मजेशीर गोड असं बॉण्डिंग या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. राधा-रुचिता पहिल्या दिवसापासून या शोमध्ये एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. पण, राधा दोन आठवडेच बिग बॉसच्या घरात होती आणि आता रुचिताचा प्रवास आठव्या आठवड्यात संपला आहे.

दरम्यान, आता रुचिताच्या एव्हिक्शननंतर टोळी पूर्णपणे संपली आहे. अनुश्रीने हा ग्रुप आधीच सोडला होता…त्यामुळे आता टोळीमधून फक्त विशाल घरात बाकी आहे. आता रुचिता बाहेर गेल्यावर गेम कसा बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय विशाल गेममध्ये पुढे जाण्यासाठी नेमकी कोणाशी मैत्री करणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.