TMKOC Fame Tanuj Mahashabde supporting Deepali sayed in Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. लवकरच  ग्रँड फिनाले पार पडणार आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये टॉप पाच फायनलिस्ट जाहीर झाले. त्यामुळे आता कोण या सीझनचा विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आता ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’मधील दिपाली सय्यदला पाठिंबा दिला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत गेली अनेक वर्षे कृष्णन अय्यर हे पात्र साकारणारा अभिनेता तनुज महाशब्देने दिपालीला पाठिंबा देत तिला व्होट करण्याचं आवाहन केलं आहे. तनुज सोशल मीडियावर नेहमी खूप सक्रिय असतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यामार्फत शेअर करत असतो. अशातच आता दिपालीबद्दल तो काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात…

तनुजचा दिपालीला पाठिंबा

तनुज इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत याबद्दल म्हणाला, “नमस्कार मी तनुज महाशब्दे बिग बॉसमधील दिपाली सय्यद या माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत. त्या समाजसेविका आहेत आणि उत्कृष्ट राजकारणीसुद्धा आहे. त्यांनी या समाजाला खूप काही दिलं आहे. आता आपण त्यांना व्होट करुन शो जिंकण्यासाठी मदत करावी अशी मी विनंती करतो. मी व्होट केलेलं आहे आता तुम्हीसुद्धा लगेचच त्यांना व्होट करा. दिपाली मॅम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.” 

‘बिग बॉस मराठी’ सीझन सहामधून कालच्या भागातून रेवा कौरसे हिची एक्झिट झाली. काही दिवसांपूर्वीच तन्वी कोलते या पर्वातील पहिली फायनलिस्ट ठरली होती त्यानंतर आता राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन हे स्पर्धक या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. 

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाचं विजेतेपद कोण पटकावणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता आह. तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने यांच्यापैकी कोण या पर्वाची ट्रॉफी उचलणार हे या कार्यक्रमाच्या अंतिम भागातच पाहायला मिळेल.