Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नुकतंच रेवा कौरासेचं मिड-वीक एव्हिक्शन झालं आहे. रेवा बाहेर गेल्यामुळे यंदाच्या सीझनच्या टॉप-५ सदस्यांची नावं आता प्रेक्षकांसमोर आली आहेत. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद हे यंदाचे टॉप-५ सदस्य आहेत. आपण सर्वांनीच पाहिलंय गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून तन्वीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय. अनेकांनी तिच या खेळात विजयी होईल अशी शक्यताही वर्तवली आहे. पण, शेवटच्या क्षणी तन्वी शोमध्ये असं काही बोलून गेलीये की… सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात…
तन्वी ‘इंद्रधनुष्य’ टास्क सुरू असताना विशाल आणि अनुश्रीला बरंच काही बोलत होती. रेवाने टॉप ५ मध्ये यावं अशी तिची मनापासून इच्छा होती. पण, प्रत्यक्षात असं घडलं नाही त्यामुळे “खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली आणि चांगल्या मनाची पोरगी बाहेर गेली” असं वक्तव्य तन्वी कोलतेने शोमध्ये केलं आहे. यामुळे प्रेक्षक देखील नाराज झाले आहेत.
तन्वी रेवाच्या एव्हिक्शननंतर म्हणाली, “तुझ्यासाठी मला दोन शब्द बोलायचे आहेत…बिग बॉसच्या घरात आली एक बाहुली. ती लेट आली पण, थेट मनात भरली! टास्क ती एकदम जबरदस्त खेळली…माझ्याबरोबर पडली, उठली, रडली आणि हसली…पण या आठवड्यात ती मला सोडून चालली. आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली…आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर चालली.”
तन्वीचं हे अजब वक्तव्य ऐकून अनुश्री म्हणाली, “आमचं मन नाहीये चांगलं बरं का…आम्ही मनातूनच घाण आहे. काहीही बोलते…माणूस घरातून चाललाय तरी हिचं वेगळंच सुरूये.”
या एपिसोडनंतर ‘कलर्स मराठी’ने व्होटिंग लाइन्स सुरू झाल्याची पोस्ट शेअर केली आहे. यावर बहुसंख्य लोकांनी “तन्वीला व्होट करू नका” अशा कमेंट्स केल्या आहेत. प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव म्हणाला, “आज रेवा जाताना तन्वी जे काही बोलली…त्यामुळे तिने सगळं काही घालवलं आहे. खोटारडेपणा आणि धक्काबुक्की राहिली असं ती म्हणाली…तिचं मन चांगलं असतं तर ती कधीच असं बोलली नसती. यामुळे आता राकेश बापट ट्रॉफी जिंकण्याची शक्यता सर्वाधिक आहे.”
अन्य नेटकरी म्हणतात, “अनुश्री आणि विशालला सपोर्ट करा”, “तन्वीने मूर्खपणा केला…”, “तन्वी आज तुझं मन कसंय हे सर्वांना समजलंय”, “तन्वीचं आजचं वागणं अजिबात बरोबर नव्हतं”, “तन्वी कधीच जिंकणार नाही…”, “अनुश्री बेस्ट आहे” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा फिनाले १९ एप्रिलला ‘कलर्स मराठी’वर रात्री ८ वाजता सुरू होईल. आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
