Bigg Boss Marathi 6 Updates 3rd Week Nomination List : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या चांगलाच रंगात आला आहे. यावर्षी घरातून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक आहे राधा पाटील. तिच्या एविक्शननंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता घरात तिसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली असून नुकतंच ‘मिस्टर इंडिया’ नॉमिनेशन कार्य पार पडलं आहे.

‘मिस्टर इंडिया’ नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने दोन-दोन स्पर्धकांच्या जोड्या बनवल्या होत्या. यापैकी एका जोडीला समोर उभ्या असलेल्या दोन स्पर्धकांमध्ये कोणाला नॉमिनेट करायचं हा निर्णय घ्यायचा होता. या टास्कदरम्यान, अनेक स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: दिपाली सय्यद यावेळी भावुक झाली होती.

आयुष संजीव घराचा कॅप्टन असल्याने या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून तो सेफ होता. तर, शेणाचं दार अन् मेणाचं दार हा टास्क खेळण्यास नकार दिल्याने बिग बॉसने आधीच सोनाली राऊतला थेट नॉमिनेट केलं होतं. यासंदर्भात तिला भाऊच्या धक्क्यावर सुद्धा जाब विचारण्यात आला होता. आता सोनाली राऊतसह या आठवड्यात ‘मिस्टर इंडिया’ टास्क खेळताना कोण-कोण नॉमिनेट झालंय पाहुयात…

घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले ८ सदस्य…

सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार

पण, या सगळ्यात सध्या सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये ओमकार राऊतची चर्चा रंगली आहे. नॉमिनेट झालेल्या ८ स्पर्धकांमध्ये ओमकारला जास्तीत जास्त मतं द्या असं आवाहन कमेंट्समध्ये दिव्या शिंदेच्या चाहत्यांकडून केलं जात आहे. कारण, त्याने दिव्याला सेफ करण्यासाठी ठामपणे आपली मतं मांडली, असं आजच्या भागात पाहायला मिळालं.

bb marathi
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

घरात राहिलेल्या १६ स्पर्धकांना बिग बॉसने गोल्डन रेशन कार्ड दिलं होतं. पण, मिस्टर इंडिया नॉमिनेशन टास्कदरम्यान काही जोड्यांना नीट विचार करून, बहुमताने निर्णय घेता आला नाही. यामुळे सध्या सगळ्यांना शिक्षा म्हणून ब्राँझ रेशन कार्ड देण्यात आलं आहे. फक्त एकट्या आयुषला बेडवर झोपण्याची परवानगी आहे. अन्य स्पर्धक स्लिपिंग बॅगवर झोपतील असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय १६ जणांना मिळून एकच
टॉयलेट-वॉशरूम वापरता येणार आहे.