Pranit More Shares Post For Karan Sonawane : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. रविवार, ११ डिसेंबर २०२५ रोजी शोचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया आणि टीव्ही, सिनेमांमधील तसेच इतर अनेक क्षेत्रांतील विविध स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. त्यात सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेला करण सोनावणेदेखील आहे.

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये करण सोनावणेची दिमाखात एन्ट्री झाली आहे. करण हा रील स्टार आणि सोशल मीडियावरील मोठं नाव आहे. फोकस इंडियन म्हणूनही त्याची लोकप्रियता आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण गेल्या काही वर्षांत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

करणच्या अनेक रील चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. करणने भारताचे क्रिकेट सामने आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघातील क्रिकेटपटूंसह रील केल्या आहेत. तसेच त्यानं अनेक बॉलीवूड अभिनेत्यांबरोबरही काही मजेशीर व्हिडीओ केले आहेत. करणच्या ‘बिग बॉस’च्या घरातील एन्ट्रीवर त्याच्या अनेक मित्रांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस’च्या मंचावर त्याची ‘ऑरेंज ज्यूस गँग’सुद्धा आली होती.

अशातच करणला ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये बघताच प्रणित मोरेनंसुद्धा आनंद व्यक्त केला आहे. प्रणितनं कालच्या ग्रँड प्रीमियरमधील व्हिडीओ शेअर करीत “भाऊ, तुला टीव्हीबर बघून खूप आनंद होत आहे” असं म्हटलं आहे. करणच्या इतर अनेक मित्रांनीसुद्धा त्याला ‘बिग बॉस मराठी ६’मधील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

pranit more shares post for karan sonawane
करण सोनावणेसाठी प्रणित मोरेची पोस्ट

‘बिग बॉस’ हिंदीच्या नुकत्याच झालेल्या सीझनमधून प्रणितनं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस १९’ या हिंदी शोमध्ये सहभाग झालेला प्रणित एकमेव मराठी स्पर्धक होता. त्याला महाराष्ट्रमधील त्याच्या चाहत्यांकडून चांगलंच प्रेम मिळालं.

दरम्यान, आता करण सोनावणे ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये त्याच्या खेळानं प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. खऱ्या आयुष्यात करणचा विनोदी स्वभाव आहे. त्यामुळे आता करण ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरातही इतर स्पर्धकांचं त्याचबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन करणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.