Bigg Boss Marathi 6: दरवर्षी जेव्हा बिग बॉसचे नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतात, त्यावेळी प्रत्येक पर्वात काही सदस्यांमध्ये शत्रुत्व दिसते, काहींमध्ये मैत्री दिसते तर काहीजण प्रेमातही पडतात. बिग बॉसच्या घरात निर्माण झालेली ही नाती बाहेरच्या जगातही टिकतात, तर काही बिग बॉसच्या घरातच संपतात. जे प्रेमात पडतात ते बाहेर आल्यानंतर रिलेशनशिपमध्ये येतात. अनेकांनी लग्नदेखील केली आहेत.

आता बिग बॉसच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेल्या रुचिता जामदारने तिच्या मनात विशाल कोटियनबद्दल भावना असल्याचे सांगितले होते. एका टास्कदरम्यान विशालदेखील रुचिता मला आवडते असे म्हणाला होता. विशाल आणि रुचिता सुरुवातीपासूनच एका गटात असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यातील मैत्रीदेखील पाहायला मिळाली.

आता मात्र त्यांच्यात फूट पडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे.

“मला तुझ्याशी बोलायचं नाही…”

या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, विशाल आणि रुचिता एकमेकांशी बोलत आहेत. रुचिता विशालला म्हणते, “तू मला आवडतो तर आवडतो.” विशाल तिला म्हणतो, “तुला असं वाटतंय की मी तुझ्या पाठीमागे यावं.” पुढे रुचिता त्याला म्हणते, “विशाल तुला कळतंय का? ती माझी रिॲक्शन होती.” त्यानंतर विशाल हात जोडत म्हणतो, “मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी तुझ्याशी बोललो ही सर्वात मोठी चूक होती. “

प्रोमोमध्ये पुढे रुचिता नाराज दिसत आहे. ती रडत असल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. त्यानंतर सागर कारंडे तिला समजावतो. राखी देखील तिला समजावते. ती म्हणते, “दु:ख करून घेऊ नकोस”, राखी असे म्हणत असतानाच रुचिता खाली पडते. त्यानंतर राखी जोरात ओरडते की विशाल ती पडली.

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “विशाल आणि रुचिताचं ब्रेकअप होणार?” अशी कॅप्शन दिली आहे.

आता विशाल आणि रुचितामध्ये कायमची फूट पडणार का? नेमके कशामुळे त्यांच्यात भांडण झाले? पुढे त्यांच्या नात्याचे काय होणार हे आगामी काळात जास्त स्पष्ट होईल. खेळात पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात काही गट पडले; जो पहिला गट निर्माण झाला त्यामध्ये रुचिता, विशाल, अनुश्री, रोशन भजनकर हे होते. त्यानंतर काटा गँग तयार झाली. यामध्ये राकेश बापट, प्रभू शेळके, तन्वी कोलते, दीपाली सय्यद हे सदस्य आहेत. आता टोळीमध्ये हळूहळू फूट पडताना दिसत आहे.