Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये रोज काही ना काही ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. नॉमिनेशन कार्यात सुद्धा हटके जोड्या जुळवून ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना मोठ्या पेचात पाडलं होतं. ‘बिग बॉस’चा प्रत्येक सीझन विविध कारणांमुळे चर्चेत असतो. भांडणं, जोड्या, खेळ आणि बरंच काही… परंतु, यंदा घरातील एका सदस्याच्या आयुष्यात काहिशी वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या सदस्याचं नाव आहे आर्या. अमरावतीची ही धाकड गर्ल पहिल्या दिवसापासून चांगला खेळ खेळत सर्वांना तगडी स्पर्धा देत आहे. पण, असं काय घडलं ज्यामुळे आर्या ढसाढसा रडली जाणून घेऊयात…

‘बिग बॉस’च्या घरात दोन ग्रुप निर्माण झाले आहेत. एका ग्रुपमध्ये निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि घन:श्याम आहेत. तर, दुसऱ्या ग्रुपमध्ये आर्या, अभिजीत, वर्षा, अंकिता, योगिता, धनंजय, सूरज हे स्पर्धक आहेत. सुरुवातीला आर्या निक्कीच्या टीमबरोबर खेळत होती. परंतु, त्यांच्यात भांडणं झाल्याने आता आर्या त्यांच्या विरुद्ध ग्रुपमध्ये खेळतेय. प्रत्येक टास्कदरम्यान आर्याचे निक्की-जान्हवीबरोबर टोकाचे वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आर्या आणि निक्कीची टीम कधीच एकमेकांशी चांगलं बोलू शकणार नाही असं वाटत असतानाच एक मोठा ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे आर्या वैभव चव्हाणच्या प्रेमात पडली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘या’ आठवड्यात नॉमिनेट झाले घरातील ‘हे’ ६ सदस्य! एका ट्विस्टमुळे झाली सर्वांची मोठी कोंडी

Bigg Boss Marathi : आर्याचं एकतर्फी प्रेम…

गेल्या काही दिवसांपासून वैभव इरिनाच्या मागेपुढे करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी जान्हवी सुद्धा इरिनाला पाहून “फॉरेनची पाटलीण” असं म्हणाली होती. यानंतर नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये वैभव इरिनाला “ही किती क्यूट आहे रे…” असं म्हणतो. यानंतर आर्याला अश्रू अनावर होतात…ती ढसाढसा रडते. “मी हे सगळं पाहू शकत नाही” असं आर्या तिच्या मित्रमंडळींना सांगत असते. यानंतर वैभव स्वत:हून तिच्याशी बोलायला येतो.

हेही वाचा : Vinesh Phogat : “प्रिय विनेश…”, मराठी अभिनेत्याची कुस्तीपटूसाठी भावुक पोस्ट; म्हणाला, “१०० ग्रॅमने मेडल हुकल्याची…”

वैभव तिला विचारतो, “तुला नक्की काय झालंय? कारण, मी माझ्या बाजूने असं काहीच नाही वागलोय” यावर आर्या म्हणते, “मला तू अट्रॅक्टिव्ह वाटतो…आणि तुला वाटत नसलं तरी मला अट्रॅक्शन होऊ शकतं” ‘बिग बॉस’ने हा प्रोमो ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. यामध्ये आर्या प्रचंड रडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “वर्षाताई एक नंबर…”, वर्षा उसगांवकरांच्या ‘या’ निर्णयाचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, नेमकं काय घडलंय? वाचा

Bigg Boss Marathi : नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘बिग बॉस’ने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ये क्या हो गया… कूछ भी”, “मला वाटलं जरा शहाणी असेल पण, आता वाटतं खरंच ही अगदी बालिश आहे”, “आर्या नको पडू गं प्रेमात”, “काय रे देवा”, “हा काय फाल्तूपणा चालूये”, “ही आर्या वेडी झालीये का” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.