Bigg Boss Marathi Aarya Slaps Nikki : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये आर्याने निक्कीला कॅप्टन्सी टास्कदरम्यान कानशि‍लात लगावल्याची घटना घडली आहे. यंदा कॅप्टनपदासाठी एकूण पाच उमेदवार दावेदार होते. धनंजय, अरबाज, वैभव, वर्षा आणि सूरज यांच्यासाठी घरात ‘जादुई हिरा’ हा कॅप्टन्सी टास्क घेण्यात येत होता. कॅप्टन्सी म्हणजे एका आठवड्याची इम्युनिटी असते. त्यामुळे घराचा कॅप्टन होण्यासाठी प्रत्येकामध्ये चढाओढ सुरू होती.

कॅप्टन्सीच्या रेसमधून पहिल्याच फेरीत जान्हवीने अरबाजला बाद केलं. त्यामुळे निक्की आधीच संतापली होती. घरभर तिचा मनमानी कारभार सुरू होता. वॉशरुम एरियामध्ये आर्या आणि तिची झटापट होऊन भडकलेल्या आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावली. या घटनेनंतर निक्कीने संपूर्ण घरात आरडाओरडा रडारड करण्यास सुरुवात केली. आता ‘बिग बॉस’कडून आर्याला मोठी शिक्षा ठोठावण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आहे. आता ही शिक्षा नेमकी काय असेल? हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर मराठी अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया पोस्ट शेअर करत दिली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi आर्याने निक्कीच्या थेट कानाखाली वाजवली! दोघींमध्ये जोरदार वाद; ‘बिग बॉस’ देणार शिक्षा; म्हणाले, “हे अतिशय निंदनीय…”

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) दुसऱ्या पर्वाची उपविजेती आणि लोकप्रिय अभिनेत्री नेहा शितोळेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. तिच्या सीझनमध्ये देखील पराग कान्हेरे या सेलिब्रिटी शेफला हिंसेमुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

“कोणीही कुठल्याही कारणांनी कुणाच्याही बाबतीत केलेली जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच आहे. हा खेळ फक्त शारीरिकरित्या सक्षम राहून खेळण्याचा नाही… जिंकण्यासाठी मनाने खंबीर आणि संतुलित असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.” अशी पोस्ट शेअर करत नेहाने आपलं मत मांडलं आहे.

Bigg Boss Marathi : मराठी अभिनेत्री नेहा शितोळेची पोस्ट

हेही वाचा : वर्षभरानंतर ‘झी मराठी’ची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा

नेमकं काय घडलं?

जादुई हिऱ्याच्या पेट्या घरातील बेडरुम, गार्डन एरिया, लिव्हिंग रुम, वॉशरुम अशा विविध भागांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ‘बी टीम’कडे बहुमत असल्याने प्रत्येकी दोन-दोन जण घरातील ( Bigg Boss Marathi ) प्रत्येक भागातील पेट्यांकडे जाऊन उभे राहिले. आर्याने वॉशरुमचा दरवाजा बंद केला. तर वर्षा उसगांवकर जादुई हिरा उचलण्यासाठी उभ्या होत्या. इतक्यात निक्कीच्या सांगण्यावरुन अरबाजने दरवाजा ढकलला आणि निक्की आत गेली. निक्कीच्या पाठोपाठ जान्हवी सुद्धा हिरा उचलण्यासाठी आत आली. इथे निक्कीला आर्याने पकडून ठेवलं होतं. याचदरम्यान, दोघींमध्ये झटापट होऊन आर्याने निक्कीच्या कानशि‍लात लगावली.