Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २८ जुलैपासून या नवीन पर्वाला सुरुवात झाली. 'बिग बॉस'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच यंदा भांडणं पाहायला मिळाली. यात प्रेक्षकांकडून निक्कीच्या 'टीम ए'ला जास्त ट्रोल करण्यात आलं. निक्की, अरबाज, घन:श्याम, वैभव, जान्हवी यांच्या टीमवर रितेश देशमुखने देखील नाराजी व्यक्त केली होती. परिणामी यांची मैत्री तुटली आणि आता हेच सदस्य आपआपसांत भांडत असल्याचं शोमध्ये पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात सध्या सहावा आठवडा सुरू आहे आणि या आठवड्यात वर्षा उसगांवकर घराच्या कॅप्टन आहेत. सर्व सदस्यांनी बहुमताने त्यांनी कॅप्टन्सीचा मान दिला होता. मात्र, सहाव्या आठवड्याचा खेळ सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी निक्कीने कॅप्टनचं न ऐकण्याचा निर्णय घेतला. तिचा घरात मनमानी कारभार सुरू असतो. वॉशरुम स्वच्छ करणार नाही, कचरा तसाच टाकणार, जेवणाचं ताट घासणार नाही असा पवित्रा निक्कीने घरात घेतलाय. त्यामुळे सगळेच सदस्य नाराज झाले आहेत. हेही वाचा : Bigg Boss Marathi - Video : “तू डबल ढोलकी आहेस”, निक्कीचं आता अभिजीतशी वाजलं; भांडणं पाहून अंकिता म्हणते, “दोघात तिसरा अन्…” जान्हवीने मात्र "मी बनवलेलं तू जेवायचं नाहीस" अशी भूमिका घेत निक्कीला या आठवड्यात चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं. पण, शेवटी 'बिग बॉस' जान्हवीला निक्कीला चहा बनवून देण्यास सांगतात. तसेच घरात मनमानी कारभार सुरू असूनही तिला अद्याप शिक्षा देण्यात आलेली नाही. यावर नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता अभिजीत केळकरची पोस्ट Bigg Boss पडलाय प्रेमात आणि प्रेम असतं XXX… त्यामुळे 'आता' कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाही. घरातलं समान उचलून आपटलं, लाथ मारून पाडलं. शारीरिक हिंसा झाली तरी 'आता' त्याला कोणीच Unfair वाटत नाही… तो 'आता' स्वत:चाच इतिहास विसरलाय. 'आता' त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा चहा हेही वाचा : Bigg Boss Marathi - Video: धनंजय पोवारची ग्रुप बीवर नाराजी; अंकिता पंढरीनाथबरोबर बोलताना म्हणाली, “त्यामुळे समीकरणे…” Bigg Boss Marathi : अभिजीत केळकरची पोस्ट https://www.instagram.com/p/C_iXlYstqpK/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, अभिजीत केळकरने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. "खरंय प्रेमाचा चहा हवाय", "खरंच मला पण प्रश्न आहे किती त्या निक्कीची नाटकं असतात", "बरोबर आहे तुमचं" अशा कमेंट्स अभिनेत्याच्या पोस्टवर आल्या आहेत.