Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज बीबी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी घरात खास डीजे क्रेटेक्स म्हणजेच कृणाल घोरपडेची एन्ट्री घेतली होती. ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्हणत क्रेटेक्सने सर्व सदस्यांचं भरभरून मनोरंजन केलं. घरातील प्रत्येक सदस्यासाठी कृणालने खास गाणी वाजवली. मात्र, या पार्टीदरम्यान ‘बिग बॉस’ने एक मोठा ट्विस्ट सांगितला.

यंदाचं पर्व ( Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांचा १०० दिवसांऐवजी ७० दिवसांमध्ये निरोप घेणार आहे. त्यामुळे आता हा शो अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहेत. घरात ‘तिकीट टू फिनाले’च्या टास्कमध्ये निक्कीने बाजी मारली होती. त्यामुळे ती यंदाच्या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली होती. यावेळी निक्की म्हणाली, “यंदाच्या सीझनचं पहिलं फायनलिस्ट व्हायचं हे माझं स्वप्न होतं आणि मी यापूर्वी याबद्दल कोणालाच सांगितलं नव्हतं. आज मी हे सर्वांसमोर सांगतेय…की, माझं ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे.”

Bigg Boss 18 rajat dalal shayari on Vivian dsena group watch video
Bigg Boss 18: रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
In Akola vanchit Bahujan Aghadi Zeeshan Hussain application withdrawn from election
वंचितला मोठा धक्का…अधिकृत उमेदवाराची माघार…आता काँग्रेसला…
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Suraj Chavan
सूरजकडे भाऊबीजेला नाही गेलीस? जान्हवी किल्लेकरच्या फोटोवर चाहत्याची कमेंट, अभिनेत्री म्हणाली…

Bigg Boss Marathi : अभिजीत सावंत ठरला दुसरा फायनलिस्ट

निक्की पाठोपाठ प्रेक्षकांनी दिलेल्या मतांनुसार गायक अभिजीत सावंत यंदाचा दुसरा फायनलिस्ट ठरला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर धनंजय पोवारने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली.

अभिजीत, धनंजय यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर जान्हवी किल्लेकरने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. तर, प्रेक्षकांचा लाडका सूरज चव्हाण यंदाचा पाचवा फायनलिस्ट ठरला आहे. यंदाच्या पर्वाच्या टॉप – ५ स्पर्धकांची घोषणा झाल्यावर डीजे क्रेटेक्सने ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला.

हेही वाचा : Bigg Boss च्या पार्टीत सूरजचा जबरदस्त डान्स! ‘झापुक झूपक’ हुकस्टेप करत वेधलं सर्वांचं लक्ष; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

वर्षा उसगांवकरांनी घेतला घराचा निरोप

टॉप-५ स्पर्धकांची घोषणा केल्यावर घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. अंकिता आणि वर्षा बॉटम – २ स्पर्धक होत्या. शेवटी ‘बिग बॉस’ने सहाव्या फायनलिस्टच्या नावाची घोषणा करत अंकिता वालावलकरचं नाव जाहीर केलं आणि वर्षा उसगांवकरांचा घरातील प्रवास ६७ दिवसांनी संपला.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजीने वयाच्या ६८ व्या वर्षी घेतली स्वत:ची गाडी! लेक तेजस्विनी आईबद्दल म्हणाली…

Bigg Boss Marathi : टॉप – ६ फायनिस्ट ठरले…

  • निक्की तांबोळी
  • अभिजीत सावंत
  • धनंजय पोवार
  • जान्हवी किल्लेकर
  • सूरज चव्हाण
  • अंकिता प्रभू वालावलकर

दरम्यान, आता ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. आता ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.